शिर्सुफळ - वनविभागातील झाडे जगवण्यासाठी प्लास्टिक बाटल्यातुन पाणी

संतोष आटोळे 
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

शिर्सुफळ - सध्या भेडसावत असलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर बारामती तालुक्यातील वनविभागाने कौतुकास्पद उपक्रम राबविला आहे. यामध्ये शिर्सुफळ, पारवडी, कन्हेरी, पिंपळी या वनक्षेत्रातील नव्याने लावलेल्या झाडांसाठी टाकावु बिस्लरी बोटलचा वापर करुन झाडांना पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, या उपक्रमाची पुणे वनविभागाच्या उपवनसंरक्षक श्रीमती लक्ष्मी यांनी पाहणी करुन कौतुक केले.

बारामती तालुक्यातील सध्याची दुष्काळाची स्थिती पाहता अनेक भागातील वनक्षेत्रात वन्यप्राणी व झाडांसाठी पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे दुष्काळावर मात करण्यासाठी बारामती वनविभागाकडुन वन्यप्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या पाण्याने भरण्यात आल्या.मात्र झाडांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्मान झाला.

त्यातच चालुवर्षी पंधरा हजार नवीन झाडे वनक्षेत्रात लावण्यात आली आहेत. हि झाडे जगवण्याचे आव्हान वनविभागापुढे होते. यासाठी बारामती वन विभागाचे अधिकारी व कर्मचा-यांनी यांनी शिर्सुफळ वनक्षेत्रातील गट क्र.80,81 व 82 मधील 15 हेक्टर रोपवनांमध्ये तसेच परिसरातील पारवडी, कन्हेरी, पिंपळी गावांमधील वनक्षेत्रामध्ये नवा उपक्रम राबवला यानुरुप सध्या बऱ्याच भागात मोकळ्या प्लास्टिक बाटल्या आढळतात त्या गोळा करुन प्रत्येक झाडाच्या मुळाला पाणी भरुन ठेवण्यात येत आहे. या बाटलीतले पाणी जवळपास आठ दिवस तरी थेंब थेंब पुरेल व ही झाडे जगतील.असे प्रयत्न सुरु आहेत. सध्या अडीच हजार झाडांवर याचा प्रयोग केला आहे. हळुहळु सर्व झाडांसाठी या पध्दतीचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे ऐन दुष्काळात झाडांना पाणी मिळत आहे.

दरम्यान पुण्याच्या उपवनसंरक्षक श्रीमती लक्ष्मी यांनी पाहणी केली व उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी त्यांच्यासह पुणे वनविभागाने सह वनसंरक्षक मधुकर तेलंग, वैभव भालेराव, बारामतीचे वनपरिक्षेत्र अधिकारी  गौरीशंकर सुपेकर, वनपरिमंडल अधिकारी त्रिंबक जराड, अमोल सातपुते वनरक्षक अनिल खोमणे, माया काळे, मीनाक्षी गुरव, तानाजी पिचड यांच्यासह वनमजुर उपस्थित होते. 

Web Title: Shirasofal - Water from plastic bottles to live in forest trees