डीएसकेंच्या मुलाला जामीन नाकारला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

पुणे - ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळला. ठेवीदारांच्या फसवणुकीचा गुन्हा गंभीर असल्याचे नमूद करून न्यायालयाने कुलकर्णी यांना आठ दिवसांत पोलिसांसमोर हजर राहण्याचा आदेश दिला.

आर्थिक फसवणूक प्रकरणी डी. एस. कुलकर्णी, त्यांच्या पत्नी हेमंती व मुलगा शिरीष यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर डीएसके व त्यांच्या पत्नी हेमंती या सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत, तर शिरीष कुलकर्णी यांच्या अटकेवर फेब्रुवारी महिन्यापासून संरक्षण होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आर्थिक फसवणुकीचे हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगून शिरीष यांना आठ दिवसांत पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगितले आहे.
दरम्यान, फसवणुकीच्या प्रकरणातील संशयित आरोपी धनंजय पाचपोर व विनयकुमार बडगंडी यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जाला विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी विरोध दर्शविला. या अर्जावर 20 जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

Web Title: shirish kulkarni bell reject court