शिक्रापूर-तळेगावकरांचा पाण्यासाठी सोमवारी रास्तारोको

भरत पचंगे
गुरुवार, 21 जून 2018

शिक्रापूर (पुणे): पावसाअभावी शिक्रापूरची पाणी पूरवठा योजना बंद होत आहे. याबाबत मागणी करुनही चासकमानचे पाणी नदीपात्रात सोडले जात नाही. येत्या दोन दिवसात नदीपात्रात न सोडल्यास शिक्रापूरात रास्तारोको करण्याचा इशारा सरपंच जयश्री भुजबळ व सर्व पक्षीय पदाधिका-यांनी दिला. या आंदोलनात तळेगाव-ढमढेरे ग्रामस्थही सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्या रेखाताई बांदल यांनी दिली.

शिक्रापूर तसेच तळेगाव-ढमढेरे व पुढील कालवाकाठच्या गावांच्या पाणी योजना चासकमानच्या पाण्यावर अवलंबून आहेत. शिक्रापूरातील पाणी पूरवठा विहीरीने तळ गाठला असून, शेजारीच असलेल्या नदीपात्रात पाणी नसल्याने शिक्रापूरकरांना पाणी पूरवठा करणे ग्रामपंचायतीला कठीण होत आहे. याबाबत पाटबंधारे विभागाला वारंवार सांगूनही वेळनदीपात्रात पाणी सोडले जात नसल्याची तक्रार सरपंच जयश्री भुजबळ यांनी केली. याबाबत गावच्या गंभीर प्रश्नाबाबत चासकमान कालवा प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास सोमवारी (ता. २५) येथील चाकण चौकात पुणे-नगर महामार्गावर रास्तारोको करण्याचा इशारा सरपंच जयश्री भुजबळ, पुणे बाजार समितीचे संचालक बाळासाहेब चव्हाण, जिल्हा परिषद सदस्या रेखाताई बांदल, माजी सरपंच रामभाऊ सासवडे, राजाभाऊ मांढरे यांनी दिला.

दरम्यान, शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे दोन्ही गावांच्या पाणी योजनांची स्थिती सारखीच असल्याने या आंदोलनात तळेगावचे जेष्ठ नेते अरविंद दादा ढमढेरे, बाजार समिती उपसभापती विश्वासकाका ढमढेरे, सरपंच ताई सोनवणे, उपसरपंच उज्वला भुजबळ, गोरक्ष सासवडे आदींसह सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार असून रास्तारोको आंदोलनानेही पाणी न सोडल्यास थेट सिंचन भवन येथे उपोषण आंदोलनाची तयारी दोन्ही ग्रामस्थांनी केल्याची माहिती माजी सभापती मंगलदास बांदल यांनी दिली. आंदोलनाबाबतची निवेदने जिल्हाधिकारी, चासकमानचे कार्यकारी अभियंता, शिक्रापूर पोलिस आदींना दिल्याची माहिती रामभाऊ सासवडे यांनी दिली.

Web Title: shirkrapu talegaon people block road for water issue