बारामतीच्या जिरायती भागाला शिरसाईच्या पाण्यामुळे दिलासा

water
water

उंडवडीस - बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील बारा गावाना शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या पाण्यामुळे दिलासा मिळू लागला आहे. 

बारामती जिरायती भागात अद्यापही दमदार पाऊस नसल्याने या भागात खरीप हंगामात पेरण्या होवू शकल्या नाहीत. ऐन पावसाळ्यात या भागात  पाण्याची भीषण टंचाई व चारा टंचाई निर्माण झाल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. 

त्यामुळे या भागातील गावाना शिरसाई उपसा सिंचन योजनेचे आवर्तन गेल्या महिन्यात 18 ऑगस्टला सुरु करण्यात आले  आहे. या योजनेच्या लाभ क्षेत्रातील बऱ्हाणपूर, गोजुबावी, उंडवडी कडेपठार, जराडवाडी, उंडवडी सुपे, गाडीखेल, शिर्सुफळ, साबळेवाडी, भोळोबाचीवाडी, कारखेल, सोनवडी सुपे, जळगाव सुपे या बारा गावातील काही पाझर तलाव, ओढा खोलीकरण व नाला माती बांधामध्ये योजनेचे पाणी सोडून भरण्यात आले आहे. त्यामुळे या भागात पिण्याच्या पाण्यासाठी व चारा पिकांसाठी पाणी उपलब्ध होवू लागले आहे. 

या योजनेच्या आवर्तनासाठी खडकवासला कालव्यातून शिर्सुफळ येथील तलावात पाणी घेण्यात येत  आहे. या तलावातून आत्तापर्यंत 175 दशलक्ष घनफूट पाणी उचलण्यात आले आहे. आणखीन 70 ते 80 दशलक्ष घनफूट पाणी उचलून योजनेद्वारे लाभ क्षेत्रातील राहिलेल्या गावांसह अंजनगाव , सोनवडी सुपे व खराडेवाडी या गावातील पाझर तलाव, ओढे, नाले भरुन देण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती शिरसाई उपसा सिंचन योजनेचे शाखा अभियंता एल. जी. भोंग व स्थापत्य अभियंत्रिकी अमोल शिंदे यांनी दिली. 

थकबाकी कमी होणार... 
या योजनेची लाभार्थी गावातील शेतकऱ्यांकडे 62 लाख रुपये थकबाकी आहे. या आवर्तनाला शेतकऱ्यांकडून पन्नास टक्के थकबाकीची रक्कम व संपूर्ण चालू आवर्तनाची रक्कम जमा करुन घेण्यात येत आहे. त्यामुळे चालू आवर्तनाची 10 ते 12 लाख रुपये व थकबाकीची 7 ते 8 लाख रुपये रक्कम पाटबंधारे विभागाकडे वसुल होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडील थकीत बाकी कमी होवून यापुढे योजना सुरळीत चालण्यास मदत होणार आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com