शिर्सुफळला सरपंचपदासाठी चौरंगी लढत

संतोष आटोळे
गुरुवार, 17 मे 2018

यंदा प्रथमच थेट जनतेतून सरपंचपदाची निवडणूक होत असल्याने चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. मतदान रविवार (ता.27) रोजी होणार आहे. तोपर्यत प्रचाराचा धडाका उडणार आहे. ग्रामपंचायत शिर्सुफळचे सरपंचपद इतर मागास प्रवर्गासाठी राखीव आहे.

शिर्सुफळ : बारामती तालुक्यामध्ये राजकीय व सामाजिक दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या शिर्सुफळ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सरपंचपदासाठी चौरंगी लढत रंगणार आहे. तर सदस्यपदाच्या 13 जागांपैकी 1 जागा बिनविरोध झाली आहे. 12 जागांसाठी  31 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

यंदा प्रथमच थेट जनतेतून सरपंचपदाची निवडणूक होत असल्याने चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. मतदान रविवार (ता.27) रोजी होणार आहे. तोपर्यत प्रचाराचा धडाका उडणार आहे. ग्रामपंचायत शिर्सुफळचे सरपंचपद इतर मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. यासाठी 12 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यावर स्थानिक पातळीवरील तडजोडीनंतर चार उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिले. यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब नामदेव आटोळे, मिलिंद शिवाजी आटोळे, अतुल दिनकर हिवरकर, सुखदेव धोंडीबा हिवरकर असा चौरंगी सामना होणार आहे. 3 हजार 682 मतदार थेट जनतेतून सरपंचपदाचा पहिला मान कोणाला देतात हे निकालानंतरच कळणार आहे.

प्रभाग क्रमांक एकमधील दोन जागांपैकी सर्वसाधरण महिलेच्या जागेवर प्रियतमा रामचंद्र धवडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. इतर मागास प्रवर्गाच्या जागेसाठी दादाराम रामदास आटोळे व ज्ञानेश्वर बबन आटोळे यांच्यामध्ये दुरंगी लढत होत आहे. प्रभाग क्रमांक दोनमधील दोन जागांपैकी सर्वसाधारण महिलेच्या जागेसाठी रंजना भारत आटोळे व वर्षा दीपक झगडे यांच्यामध्ये तर अनुसूचित जातीच्या जागेसाठी जालिंदर मारुती घोडे, धनंजय साधु घोडे व शंकर लक्ष्मण सातपुते अशी तिरंगी लढत होत आहे.  

प्रभाग क्रमांक तीन मधील तीन जागांपैकी नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या स्त्रीच्या जागेसाठी लताबाई बापूराव आटोळे व राणी शहाजी गावडे यांच्यामध्ये सर्वसाधारण स्त्री जागेसाठी ताराबाई राजेंद्र आटोळे व  सुवर्णा संतोष आटोळे यांच्यामध्ये तर सर्वसाधरण जागेसाठी ताराबाई राजेंद्र आटोळे, राजेंद्र चंदर आटोळे, विठ्ठल सुरेश गाढवे, रायचंद बळीराम झगडे अशी लढत होत आहे. 

प्रभाग क्रमांक चारमध्ये तीन जागांपैकी नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या महिलाजागेसाठी अनिता दादासाहेब आटोळे व छाया विठ्ठल कुंभार यांच्यामध्ये सर्वसाधारण महिलेसाठी स्वप्निला महेश आटोळे, इंदूबाई शिवाजी लंगोटे, अश्विनी योगेश शिंदे, राधाबाई भारत सवाणे यांच्यामध्ये तर सर्वसाधारण जागेसाठी विश्वास तानाजी आटोळे, कांतिलाल कपूरचंद गुंदेचा, राजमहंमद शेख यांच्या लढत होणार आहे.

प्रभाग पाचमधील तीन जागांपैकी अनुसूचित स्त्री जागेसाठी पार्वती कुंडलिक घोडे व प्रमिला दत्तात्रय शिंदे यांच्यामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गातून बनकर मच्छिंद्र सोपाना, भारत विठ्ठल हिवरकर, रमेश बापुराव हिवरकर यांच्यामध्ये तर सर्वसाधारण गटातून हनुमंत बबन म्हेत्रे व सनी जगदीश शिंदे यांच्यामध्ये लढत होणार आहे. 

Web Title: In Shirsufala For Sarpanch Post Quadrupling Fight