शिर्सुफळ - गाडीखेल ते कटफळ स्टेशन रस्त्यादुरुस्ती कामाचा प्रारंभ

shirsufal
shirsufal

शिर्सुफळ -  बारामती तालुक्यातील गाडीखेल ते कटफळ स्टेशन या साडेचार किलोमीटर अंतराच्या रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन 2 कोटी 38 लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे.

गाडीखेल येथील ग्रामस्थ दैनंदिन कोणत्यान कोणत्या कारणाने तालुक्याचे ठिकाण असलेल्या बारामती तसेच एमआयडीसीकडे जात असतात. लयासाठी त्यांना सर्वात जवळचा मार्ग म्हणजे सह्याद्री अॅग्रो, कटफळ स्टेशन मार्ग एमआयडी, बारामती मात्र गेल्या अनेक वर्षापासुन गाडीखेल पासुन दोनशे मीटर अंतरावर असलेला तीव्र चढ याची झालेली दुरावस्था तसेत कटफळ स्टेशन पर्यत रस्त्याच्या सर्वत्र उखडलेली खडी यामुळे ग्रामस्थांची तसेच प्रवाशांची अत्यंत गैरसोय होत होती.याचा परिणाम ग्रामस्थांना दुसऱ्या मार्गाने प्रवास करावा लागत होता. यामुळे वेळ, पैसा व श्रम व्यर्थ जात होते. यामुळे या मार्गाच्या दुरुस्तीची वारंवार मागणी होत होती.

या पार्श्वभूमिवर रोहित पवार यांनी दिलेल्या माहितीनुरुप राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून गाडीखेल ते कटफळ स्टेशन मार्गासाठी 2 कोटी 38 लाख रुपयांचा निधी मंजुर झाला.या कामाचा शुभारंभ करण्यात आला.याप्रसंगी पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, उपसभापती शारदाताई खराडे, पंचायत समिती सदस्य लिलाताई गावडे, सरपंच बाळासाहेब आटोळे, उपसरपंच नानासो जगताप, सदस्य शरद शेंडे अनिल दळवी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शेडगे साहेब, वनविभाग सुपेकर, जराड, ठेकेदार आनिल देशमुख, अनिल आटोळे, दिलिप आटोळे  तानाजी आटोळे, ज्ञानदेव जगताप दादा आटोळे,  ग्रामसेवक प्रदिप बनसुडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

एकाच कामाचे दोनदा भूमिपूजन...
सदर कामाचा शुभारंभ काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांच्या हस्ते करण्यात आला होता.मात्र स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांनी सदर कामाच्यासाठी अजित पवार, सुप्रिया सुळे व रोहित पवार यांच्यामुळेच निधी मिळाला आहे.अशी भूमिका घेत दुसऱ्यांदा भूमिपूजन घेतले. यामुळे एकाच कामाचे दोनदा भूमिपूजन करण्याची वेळ आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com