शिरूर मतदारसंघात सर्वाधिक कामे माझी - खासदार आढळराव पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

चाकण - ‘‘मी औद्योगिक वसाहतीत कोणाकडे हप्ते मागितले नाहीत, ठेकेदारी मागितली नाही. वादविवाद, हाणामाऱ्या केल्या नाहीत. मी फक्त विकासकामे केली आहेत. त्यामुळे मी पुन्हा खासदार होणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक कामे मी केली आहेत. सर्व गावांत, वाड्या-वस्त्यांवर पोचलेला मी एकमेव खासदार आहे,’’ असा दावा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला.  

भोसे (ता. खेड) येथे सुमारे सहा कोटी छत्तीस लाखांच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी आढळराव बोलत होते. ते म्हणाले, की या मतदारसंघाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी मी संसदेत अधिक प्रश्न विचारले. खासदाराला पाच कोटींचा निधी असतो, त्यातून किती गावांत कामे होणार, प्रत्येक गावाला, वाड्या,-वस्त्यांना निधी देण्याचा मी प्रयत्न केला आहे. पुणे-नाशिक लोहमार्गाचे काम येत्या काही महिन्यांत सुरू होणार आहे. भोसेत प्रथमच एवढ्या मोठ्या रकमेची कामे होत आहेत. 

आमदार सुरेश गोरे म्हणाले, की खेड तालुक्‍यातील प्रत्येक गावात काहीना काही विकासकामे करण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यांचे; तसेच राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजनेचे काम होणार आहे.

या वेळी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, पंचायत समिती सदस्या ज्योती अरगडे यांची भाषणे झाली. पंचायत समितीचे उपसभापती भगवान पोखरकर, शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर, किरण मांजरे, भोसेच्या सरपंच शीतल चव्हाण, उपसरपंच किरण कुटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. माजी सरपंच गणेश चव्हाण यांनी प्रास्ताविक, तर सुदाम कराळे यांनी सूत्रसंचालन केले. संदीप गांडेकर यांनी आभार मानले.

Web Title: Shirur Constituency Work Shivajirao Adhalrao Patil