श्री येमाई देवीचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पडला पार

युनूस तांबोळी
शनिवार, 31 मार्च 2018

टाकळी हाजी (ता. शिरूर, पुणे): सनईच्या सुरावर ताशा ढोल चे पारंपारीक वाद्य, सजविलेली श्री येमाई देवीची पालखी. भंडाऱ्याची उधळण करत आंबाबाईचा उदो उदो... जगदंबेचा उदो उदो च्या जयघोषात कवठे येमाई (ता. शिरूर) येथील श्री येमाई देवीचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

टाकळी हाजी (ता. शिरूर, पुणे): सनईच्या सुरावर ताशा ढोल चे पारंपारीक वाद्य, सजविलेली श्री येमाई देवीची पालखी. भंडाऱ्याची उधळण करत आंबाबाईचा उदो उदो... जगदंबेचा उदो उदो च्या जयघोषात कवठे येमाई (ता. शिरूर) येथील श्री येमाई देवीचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील श्री येमाई देवीच्या दर्शनासाठी राज्यातून भावीक येत असतात. नवसाला पावणारी कुलदैवत म्हणून हे मंदीर प्रसिद्ध आहे. चैत्र पोर्णीमेला या देवीचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. शुक्रवारी (ता. 30) गावातील श्री येमाईदेवी सभागृहापासून चोळी पातळ वाजत गाजत नेण्यात आले. गावापासून तीन किलोमिटर अंतरावर श्री येमाईदेवीचे मंदिर आहे. आज (शनिवार) सकाळी श्री येमाईदेवी मंदिरात देवीला अभीषेक करण्यात आला. हनुमान जयंती निमित्त गावामध्ये हनुमान चालीसा व भजनाचा कार्यक्रम झाला. या ठिकाणी भावीकांनी गर्द केली होती. त्यानंतर गावात श्री येमाई देवीची पालखी फुलांनी सजविण्यात आली होती. गावातील ताशा, डफ, संबळ या पारंपारीक वाद्याने या पालखी सोहळ्यास सुरवात करण्यात आली. बहुरूप्याचा घोडा हे या पालखी सोहळ्याचे मुख्य आकर्षण होते.

गावातील मंडळानी पारंपारीक ढोल लेझीम पथकाच्या सहाय्याने जुने लेझीम प्रात्यक्षिके सादर केली. पालखी सोहळ्याच भावीकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. आंबाबाईचा उदो उदो...जगदंबेचा उदो उदो चा जयघोश करण्यात आला होता. गावातून हा पालखी सोहळा पायी तिन किलोमिटर अनवाणी पायाने नेण्यात आला. मंदिरात गेल्यावर आरती घेण्यात आली. भावीकांनी यासाठी मोठी गर्दी केली होती. ओलांडा व आरती घेऊन मंदिरातील देवीच्या दर्शनासाठी रांग लावण्यात आली होती. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.

कवठे येमाई (ता. शिरूर ) येथील श्री येमाई देवीचा पालखी सोहळा.

Web Title: shirur kawthe yemai shree yamai devi palkhi yatra