शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित कामे मार्गी लावू : एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना ग्वाही.
eknath shinde
eknath shindeSakal

मंचर : “शिरूर लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाचे प्रलंबित प्रकल्प मार्गी लावले जातील. अन्य विकास कामांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी कमी पडून देणार नाही. अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. लवकरच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विकास कामांसाठी बैठक होणार आहे.” असे शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी सांगितले.

बुधवारी (ता. १७) मुंबई येथे आढळराव पाटील व सोनवणे यांनी शिंदे यांची भेट घेऊन आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर, हवेली कामांबाबत चर्चा केली. यासंदर्भात आढळराव पाटील म्हणाले की, “ खेड तालुका पंचायत समिती इमारतीचे काम पूर्वी मंजूर असलेल्या जागेवर लवकर सुरू करावे, छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ असलेल्या मौजे तुळापूर (ता. हवेली) व समाधीस्थळ स्मारक वढू बुद्रुक (ता.शिरूर) येथे अद्यावत विकास आराखड्यास प्रशासकीय मंजुरी मिळून निधी उपलब्ध व्हावा"

ekanath shinde
ekanath shindesakal

याशिवाय 'जुन्नर तालुक्यातील खानापूर येथे श्री कुकडेश्वर आदिवासी हिरडा प्रक्रिया उद्योग सुरू करावा, आंबेगव्हाण (ता.जुन्नर) येथे बिबट सफारी प्रकल्प लवकर हाती घ्यावा, जुन्नर तालुक्यातील पूर येथील आदिवासी समाजाचे दैवत श्री क्षेत्र कुकडेश्वर या प्राचीन मंदिराचे जतन व संवर्धन होण्यासाठी पाच कोटी रुपये निधीला मंजुरी द्यावी." या महत्त्वपूर्ण विषयांवर संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री यांनी आपल्या दालनात विशेष बैठक आयोजित करावी. अश्या मागण्या यावेळी आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्या.

“शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या भागातील विकास कामांना राज्य शासनाच्या माध्यमातून प्रशासकीय मंजुरी देण्याबरोबरच येथील जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले प्रश्न योग्य पद्धतीने मार्गी लागावेत यासाठी आपण प्राधान्याने सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली आहे.:”सोनवणे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com