अवैध धंद्यांवरील कारवाईकडे शिरूरकरांचे लक्ष

युनूस तांबोळी
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

टाकळी हाजी (पुणे): शिरूर तालुक्‍यात दारूवाले व वाळूमाफियांवर कडक करवाई करू, असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिला आहे. मात्र, नेमकी कारवाई कधी होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

टाकळी हाजी (पुणे): शिरूर तालुक्‍यात दारूवाले व वाळूमाफियांवर कडक करवाई करू, असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिला आहे. मात्र, नेमकी कारवाई कधी होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुक्‍यातील पश्‍चिम भागात मोठ्या प्रमाणात अवैद्य धंदे सुरू आहेत. वाळूमाफियांकडे महसूल विभागाचे लक्ष नाही. रात्रीचा वाळूउपसा व वाहतूक होत असल्याने पोलिसांनादेखील याची खबर नसते. पोलिसांना खबर देणारेच हप्ते गोळा करण्यात गुंतल्याची चर्चा आहे. हप्ते न मिळालेल्या दारूभट्ट्यांवर कारवाई करण्यात येते. मात्र, दिवसाढवळ्या ढाब्यांवर विकल्या जाणाऱ्या देशी-विदेशी दारूकडे पोलिस खात्याचे दुर्लक्ष होत आहे. परिसरात झालेल्या घरफोडी अथवा चोरीचा तपासदेखील अद्याप लागला नाही. दुचाकी चोरण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे.

पोलिस पाटील, पोलिस मित्र व ग्रामसुरक्षा दलाचे तरुण पोलिस खात्याला मदत करू लागले आहेत. त्यातून तपास कामात चांगली मदत होऊ लागली आहे. पोलिस ठाण्याच्या वार्षिक तपासणीसाठी तुटपुंज्या कारवाया केल्या जातात. पोलिस कर्मचारी कमी असल्याची तक्रार पुढे करून कुठे कुठे पाहायचे, असा सवाल पोलिसांमधून विचारला जातो. शेतकऱ्यांचे नुकसान करून या भागातून विजेची टॉवर लाइन जाते. भरपाई न मिळाल्याने शेतकरी काम रखडवतात. अशा ठिकाणी मात्र दोन पोलिसांचा बंदोबस्त देऊन टॉवर लाइनच्या तारा ओढून दिल्या जात आहेत. या कामासाठी पोलिस कर्मचारी आहेत का, असा सवाल शेतकरी विचारत आहेत.

Web Title: Shirur taluka attention to illegal activities