शिरूरमधील अडीच हजार विद्यार्थ्यांना विशेष प्राविण श्रेणी

ssc result
ssc result

तळेगाव ढमढेरे (पुणे) : दहावीच्या परीक्षेत शिरूर तालुक्याने शेकडा निकालात सातत्य राखले असून, तालुक्याचा सरासरी निकाल ९७.८१ टक्के लागला आहे. तालुक्यात एकूण ७८ माध्यमिक विद्यालये असून, त्यापैकी 33 माध्यमिक विद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तालुक्यातील ६०३७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ५९०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांनी दिली. 

१०० टक्के निकाल लागलेली विद्यालये पुढीलप्रमाणे : विद्या विकास मंदिर निमगाव (म्हाळुंगी), न्यू इंग्लिश स्कूल (भांबर्डे), मंगलमूर्ती विद्याधाम (रांजणगाव गणपती), श्री संभाजीराव पलांडे प्रगती हायस्कूल (मुखई), श्री गुरुदेव दत्त विद्यालय (सविंदणे), न्यू इंग्लिश स्कूल (इनामगाव), गुरुनाथ विद्यालय (वडनेर), श्रीमती बबईताई टाकळकर माध्यमिक आश्रमशाळा (निमगाव म्हाळुंगी), कालिकामाता विद्यालय (वाघाळे), अभिनव विद्यालय (सरदवाडी), तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालय (निर्वी), इंग्लिश मिडीयम स्कूल (शिरूर), न्यू इंग्लिश स्कूल (उरळगाव), न्यू इंग्लिश स्कूल (पिंपळसुटी), शरदचंद्रजी पवार विघालय (वढू), हनुमान विद्यालय (निमगाव भोगी), छत्रपती संभाजीराजे विद्यालय (जातेगाव), जय मल्हार माध्यमीक विद्यालय (मोराची चिंचोली), शरदचंद्रजी माध्यमिक विद्यालय (चिंचणी),  रसिकलाल धारिवाल इंग्लिश मिडीयम स्कूल (शिरूर), समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालय (तळेगाव ढमढेरे),  घनोबा विद्यालय (धानोरे), आबासाहेब पाचंगे विद्यालय (ढोकसांगवी), श्री भैरवनाथ माध्यमीक विद्यालय (कोयाळी, शिक्रापूर), पांडुरंगअण्णा थोरात विद्यालय (आमदाबाद), कै. रा. गे. पलांडे आश्रमशाळा (मुखई), पद्ममणी इंग्लिश मिडीयम स्कूल (पाबळ), जीवन विकास माध्यमीक विद्यालय (शिरूर), विजयमाला विद्या मंदिर (शिरूर), जिजामाता इंग्लिश मिडीयम स्कूल (सणसवाडी),  आर.एम.डी. सिंहगड स्कूल (कोंढापुरी), बालाजी माध्यमिक विद्यालय (शिरूर), अजिंक्यतारा इंग्लिश मिडीयम स्कूल (शिक्रापूर).

दरम्यान, शिरूर तालुक्यातील श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या पाच विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. निकालातील सतत्याबद्दल सस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

निकालाचे ठळक वैशिष्ट्ये 

 - विशेष प्राविण श्रेणी- २५१५ विद्यार्थी
 - प्रथम श्रेणी- २११६ विद्यार्थी
 - द्वितीय श्रेणी- १०९२
 - पास श्रेणी- १८२ विद्यार्थी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com