शिर्सुफळ येथील तरुणांचे रस्त्यासाठीचे उपोषण तिसऱ्या दिवशी मागे 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 15 मार्च 2019

शिर्सुफळ - शिर्सुफळ (ता.बारामती) येथील सोनबा पाटील वस्ती वरील तिसऱ्या पिढीच्या तरुणांनी दोन पिढ्यांनंतरही वस्तीला जाण्यासाठी रस्ता नसल्याने केलेल्या उपोषणाला यश मिळाले आहे.याबाबत बारामतीचे तहसिलार विजय पाटील व भूमि अभिलेखचे उप अधिक्षक शिवप्रसाद गौरकर यांच्या यशस्वी मध्यस्थीने तहसिलदार यांच्या लेखी आश्वासनानंतर गुरुवार (ता.14)  तिसऱ्या दिवशी उपोषण मागे घेण्यात आले. 

शिर्सुफळ ग्रामपंचायत अंतर्गत येणारे सोनबा पाटील वस्तीला दौंड बारामती रेल्वे लाईन वरील गेट बंद झाल्याने कधी चिखल काटे तुडवत तर कधी दूरच्या अंतरावरुन दैनंदिन गरजा भागवण्यासाठी गावाशी संपर्क ठेवावा लागत आहे.

याबाबत वस्ती वरील तरुणांनी एकत्र येत रस्त्यासाठी उपोषणाचा निर्णय घेवुन मंगळवार (ता.12) पासुन उपोषणाला बसले होते.याबाबत प्रशासनाच्या वतीने तात्काळ संबंधित रस्त्याच्या बाजुच्या दोन्ही गटांच्या मोजणी व हद्दनिश्चितीचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले. यानुरुप एकाच दिवसात सर्व मोजनी करण्यात आली.परंतू पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यास वेळ जाणार होता.याबाबत तहसिलदार, भूमिअभिलेखचे उपअधीक्षक यांनी गावचे सरपंच आप्पासाहेब आटोळे, ग्रामपंचायत सदस्य विश्वास आटोळे, दादासाहेब आटोळे, बारामती तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र आटोळे, अनंता आटोळे, सदाशिव आटोळे तसेच गावातील प्रतिष्ठीत व उपोषणकर्ते यांच्यासह झालेल्या चर्चेत रस्ता मिळालाच पाहिजे परंतू भविष्यात टिकलाही पाहिजे म्हणुन सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करुन येत्या 25 तारखेला गटहद्द निश्चित करुन सहमतीने रस्ता काढुन दिला जाईल असे लेखी आश्वासन दिले.

यावेळी प्रशासनाच्या सकारात्मक निर्णयामुळे उपोषण कर्त्यांनी मान्यवरांच्या हस्ते लिंबुपाणी घेवुन उपोषण सोडले.

उपोषणाच्या पहिल्या दिवसापासून फक्त दै.सकाळ ने दिलेल्या सचित्र प्रसिध्दीमुळेच आमचा दखल प्रशासनाने घेतली याबद्दल उपोषण कर्ते योगेश आटोळे, विठ्ठल आटोळे, सोमनाथ आटोळे, विठ्ठल आटोळे, ज्ञानदेव आटोळे यांनी सकाळचे आभार व्यक्त केले.

आमच्या पोरांनी हक्काच्या रस्त्यासाठी उपोषण केले.त्यास प्रशासनाने योग्य दखल घेतल्याने उपोषण मागे घेण्यात आले आहे.मात्र योग्य वेळी रस्ता प्रश्न मार्गी लागला नाही तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवरच बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे. वस्तीवरील ग्रामस्थांनी दै.सकाळ प्रतिनिधीशी बोलताना दिला.

शिर्सुफळ (ता.बारामती) सोनबा वस्तीकडे जाण्यासाठी हक्काचा रस्ता मिळावा यासाठी उपोषणाला बसलेल्या तरुणांनी तहसिलदार यांच्या आश्वासनानंतर त्यांच्याच हस्ते थंडपेय घेवुन उपोषण सोडले.

Web Title: Shirusufal fast on the third day stop