
Shiv Jayanti 2023 : बारामतीत शिवजयंतीनिमित्त विविध उपक्रम
बारामती - तिथीनुसार आज बारामतीत मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. कसब्यात छत्रपती शिवरायांना अनेक मान्यवरांनी अभिवादन केले. शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या प्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, मुख्याधिकारी महेश रोकडे, पोलिस निरिक्षक सुनील महाडीक, शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष सुनील शिंदे, नियोजनप्रमुख हेमंत नवसारे, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांच्यासह संभाजी होळकर, जय पाटील, नामदेव तुपे, देवेंद्र शिर्के, प्रदीप शिंदे, संभाजी माने, सुनिल सस्ते, दिलीप ढवाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मराठा आरमार देखावा ठरला आकर्षण
शिवराज्य प्रतिष्ठानने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात शरयू फौडेशन च्या अध्यक्षा शर्मिला पवार, सचिन सातव, महेश रोकडे, सुनील महाडिक, सिद्धनाथ भोकरे, सुभाष सोमाणी, प्रकाश पळसे, अविनाश बांदल, विशाल जाधव, प्रताप जाधव, अनिता गायकवाड, अमजद बागवान, किशोर सराफ, रोहित सराफ, बबलू देशमुख, प्रताप जाधव, शुभम अहीवळे, करण वाघोलिकर, राहुल वाघोलीकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केलें
यंदा शिवराज्य प्रतिष्ठानने "भारतीय नौदलाचे जनक" छत्रपती शिवाजी महाराज यांचा लढाऊ"मराठा आरमार" चा देखावा उभा केला होता. इचलकरंजी येथील कलाकार किरण कुंभार यांनी हा देखावा साकारला आहे. येथुन हा देखावा आणण्यात आला, तेथील किरण कुंभार या कलाकाराने हा देखावा बनवला मिळाले.
शिवराज्य प्रतिष्ठानचे श्रीकांत जाधव, नीलेश गायकवाड, चेतन जाधव, अतिश गायकवाड, गौरव जाधव, धनु बंडगर, प्रथमेश गायकवाड, सौरभ राठोड, श्रीकांत साळुंके, श्रीपाद कळसकर यांनी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. बारामती- येथील शिवराज्य प्रतिष्ठानने उभारलेला मराठा आरमार हा देखावा बारामतीत शिवजयंतीच्या आकर्षणाचे केंद्र बनला.