Shiv Jayanti 2023 : उत्सव साजरा करत असताना शिवरायांचे गुण अंगी बाळगा; प्राजक्ता माळी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर भरपूर प्रमाणात कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत.
Shiv Jayanti 2023 Embrace the virtues of Shivaji maharaj Prajakta Mali
Shiv Jayanti 2023 Embrace the virtues of Shivaji maharaj Prajakta Malisakal

कॅन्टोन्मेंट : उत्सव साजरा करत असताना उत्सवामगाची धारणा व संकल्पना याचा सर्वांनी अभ्यास केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर भरपूर प्रमाणात कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत.

त्याचे वाचन करून त्यातील गुण आपण अंगी बाळगले पाहिजे. तसेच त्यांचे विचार आपल्यामध्ये झिरपले पाहिजे. असे प्राजक्ता माळीने एका कार्यक्रमाप्रसंगी तरुणांना विनंती करत आपले मनोगत व्यक्त केले.

Shiv Jayanti 2023 Embrace the virtues of Shivaji maharaj Prajakta Mali
Pune Accident : स्पीड ब्रेकरवर PMPML बस आदळली अन् महिला प्रवाशाचा मोडला मणका

सम्राट ग्रुपच्या वतीने सोमवार पेठ येथे शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी येथे पावनखिंड फेम अभिनेत्री प्राजक्ता माळीने कार्यक्रमाला हजेरी लावली. याप्रसंगी ती बोलत होती. कार्यक्रमाचे आयोजन सम्राट ग्रुपचे आधारस्तंभ माजी. सभागृह नेते गणेश बिडकर, विशाल दरेकर, अध्यक्ष विशाल पवार यांनी केले. सोहळ्या निमित्त शिवज्योत आगमन, महाराजांचे मूर्तिपूजन, महाआरती करण्यात आली.

Shiv Jayanti 2023 Embrace the virtues of Shivaji maharaj Prajakta Mali
Shiv Jayanti 2023 : तिथीनुसार शिवजयंती उत्साहात; मिरवणुकीत 2 चित्ररथांचा समावेश

यावेळी शिव जयंतीच्या उत्साहात प्राजक्ताला पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली. प्रत्येक जण तिच्या सोबत सेल्फी घेण्यासाठी व तिचे चित्रीकरण करण्याचा आनंद घेत होते. यावेळी महिलांसोबत प्राजक्ताला ही सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही.

Shiv Jayanti 2023 Embrace the virtues of Shivaji maharaj Prajakta Mali
Pune News : आज्जीसाठी चोरट्याला भिडणारी नात Exclusive मुलाखत

पुढे ती म्हणाली की, तारखेनुसार नाही तर तिथी नुसार शिव जयंती साजरी होत असल्याचा मला आनंद होत आहे. आपल्या सनातन धर्माचे गणित, खगोल शास्त्र, पंचाग, मराठी महिने हे सर्व अचूक असल्याने त्यामागे मोठे सायन्स आणि लॉजिक आहे. पुढच्या पिढी पर्यंत हे विचार गेले पाहिजे. ही सर्व आपली जबाबदारी आहे. उत्सवाची मजा आनंद घेत आपण समृद्ध झाले पाहिजे. त्याच बरोबर दोन्हींचा समतोल ही राखता आला पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com