Shiv Jayanti 2023 : बारामतीत छत्रपती जन्मोत्सव समितीकडून विधायक उपक्रम

महिला व युवतींना स्वसंरक्षणार्थ लाठी काठी, दांडपट्टा चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले
Shiv Jayanti 2023
Shiv Jayanti 2023SAKAL

बारामती : तिथीनुसार साज-या झालेल्या शिवजयंतीनिमित्त छत्रपती जन्मोत्सव समितीच्या वतीने विविध विधायक उपक्रमांचे आयोजन केले गेले. महिला व युवतींना स्वसंरक्षणार्थ लाठी काठी, दांडपट्टा चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. येथील नटराज नाट्य कला दालनामध्ये शिवकालिन शस्त्रांचे प्रदर्शन तसेच मराठा आरमार व जलदुर्ग यांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन आयोजित केले गेले.

Shiv Jayanti 2023
Shiv Jayanti 2023 : बारामतीत शिवजयंतीनिमित्त विविध उपक्रम

दरम्यान शिवचरित्रातील विविध विषयांवर निबंध स्पर्धेचे आयोजन केले गेले. याला मोठा प्रतिसाद मिळाला. भक्ती शक्ती संगम हा अभंग, भारुड, शिवगीतांचा अवधूत गांधी आळंदीकर यांचा गायनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला. दरम्यान जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बारामतीच्या माजी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर यांचा महाराणी येसूबाई या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या शिवाय समितीच्या वतीने शिवगौरव पुरस्कारांचेही वितरण या वेळी केले गेले.

Shiv Jayanti 2023
Shiv Jayanti 2023 : शिवरायांच्या 'या' कृतीमुळं हिंदू मनं पुन्हा ताठ उभी राहू लागली; राज ठाकरेंची खास पोस्ट

वृक्षारोपण व पर्यावरणात काम करणारे समीर बनकर, कण्हेरीचे मठाधिपती कोकाटे महाराज, गोवंश रक्षणात कार्यरत असलेले शिवशंकर स्वामी यांना शिवगौरव पुरस्कार प्रदान केला गेला. यंदा शिवरायांची पारंपरिक पध्दतीने पालखीतून शहर प्रदक्षिणा काढण्यात आली होती. बारामतीकरांनी या सर्वच उपक्रमांना भरभरुन प्रतिसाद दिला. रोहन शेरकर, रोहन ढवाण, सुदीत तावरे, सागर जाधव, संदीप मोहिते, संदीप जाधव, चारुदत्त काळे, अमोल मासाळ आदींनी या सर्व उपक्रमांचे आयोजन केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com