..तर पुढच्या वेळी सत्तेत नसू - शुक्‍ला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

पुणे - देशात गेल्या वर्षी एक जुलैला वस्तू व सेवाकर लागू झाला. हाच कायदा लागू करण्यासाठी सिंगापूरमध्ये पाच वर्षे लागली. जर आम्ही काही निर्णय घेण्यात चुकलो असेल तर देशात लोकशाही आहे. आज आम्ही सत्तेत आहोत, उद्या दुसरा पक्ष सत्तेत असेल, असे वक्तव्य केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिव प्रताप शुक्‍ला यांनी शुक्रवारी केले.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चरच्या (एमसीसीआयए) वतीने आयोजित परिसंवादामध्ये ते बोलत होते. या वेळी खासदार अनिल शिरोळे, राज्यसभा सदस्य अमर साबळे, जीएसटीचे पुणे विभागाचे मुख्य आयुक्त ए. के. पांडे, प्राप्तिकर विभागाचे पुणे विभागाचे मुख्य आयुक्त विनोदानंद झा, एमसीसीआयएचे प्रमोद चौधरी, एमसीसीआयएचे खजिनदार चंद्रशेखर चितळे यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.

शुक्‍ला म्हणाले, 'आमच्या धाडसी निर्णयामुळे "इन्स्पेक्‍टर राज' जाऊन "ऑनलाइन इन्स्पेक्‍टर' पद्धती आली. एकेकाळी आमचा दोन खासदारांचा पक्ष व्यापाऱ्यांचा पक्ष म्हणून ओळखला जायचा. त्यानंतर केंद्रात स्पष्ट बहुमत मिळवून चार वर्षे पूर्ण करून मोदी सरकार पाचव्या वर्षात पदार्पण करीत आहे. देशहितासाठी व्यापारी आणि उद्योजकांनी आम्हाला पुढील काळातदेखील सहकार्य करावे.''

जीएसटीचा पांडे यांनी, तर प्राप्तिकर विभागाचा झा यांनी आढावा घेतला. सूत्रसंचालन चितळे यांनी केले. आभार एमसीसीआयएचे सरव्यवस्थापक अनंत सरदेशमुख यांनी मानले.

Web Title: shiv pratap shukla talking politics