Vidhan Sabha 2019 : भाजप-सेनेकडे 12 जागांची शिवसंग्राम पक्षाची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

विधानसभा निवडणुकीत शिवसंग्राम पक्षाने भाजप-शिवसेना युतीकडे 12 जागांची मागणी केली आहे. याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिली.

विधानसभा 2019
पुणे - विधानसभा निवडणुकीत शिवसंग्राम पक्षाने भाजप-शिवसेना युतीकडे 12 जागांची मागणी केली आहे. याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिली. दरम्यान, युतीमध्ये जागांबाबत ओढाताण होत असून, भाजप हा घटक पक्षांना विश्‍वासात घेत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. 

मेटे म्हणाले, ""कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मित्रपक्षांना विश्‍वासात घेतो, तसे भाजप-शिवसेनेकडून होताना दिसत नाही. भाजपने अगोदर घटक पक्षांसोबत चर्चा करणे अपेक्षित आहे. शिवसंग्रामने युतीकडे 12 जागा देण्याबाबत मागणी केली असून, याबाबत दोन बैठका झाल्या आहेत. भाजपसह घटक पक्ष स्वतंत्र लढल्यास शिवसंग्राम पक्षही स्वतंत्र लढेल. तसेच, मित्रपक्ष भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढत असतील तर आम्हीही भाजपच्या चिन्हावर लढू.'' 

ते म्हणाले, ""शिवस्मारकाचे काम सुरू करण्यात आले; परंतु न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे हे काम थांबले आहे. विरोधकांकडे कोणताही मुद्दा नसल्यामुळे विरोधक या मुद्यांवर टीका करीत आहेत.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sangam Party demands 12 seats to BJP-Sena