Vidhan Sabha 2019 : पाचर्णेंच्या पोस्टरवर ठाकरे पितापुत्र 6-7 क्रमांकावर; शिवसैनिक नाराज

निलेश कांकरिया
Thursday, 3 October 2019

Vidhan Sabha 2019 : वाघोली : भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार बाबुराव पाचर्णे यांचा अर्ज भरण्यापूर्वीच पाचर्णे यांच्या बाबतची शिवसैनिकांची नाराजी सोशल मीडियावर दिसू लागली आहे. त्याचे कारण आहे. अर्ज भरण्याच्या जाहिरातीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे सहा क्रमांकावर घेतलेले छायाचित्र व अहवालात माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचे नसलेले छायाचित्र.
 

Vidhan Sabha 2019 : वाघोली : भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार बाबुराव पाचर्णे यांचा अर्ज भरण्यापूर्वीच पाचर्णे यांच्या बाबतची शिवसैनिकांची नाराजी सोशल मीडियावर दिसू लागली आहे. त्याचे कारण आहे. अर्ज भरण्याच्या जाहिरातीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे सहा क्रमांकावर घेतलेले छायाचित्र व अहवालात माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचे नसलेले छायाचित्र.
 Image may contain: 6 people, people smiling
महायुतीचे उमेदवार बाबुराव पाचर्णे यांची उमेदवारी दोन दिवसांपूर्वीच निश्चित झाली. ते आज अर्ज भरणार असल्याने त्याबाबतच्या जाहिराती सोशल मीडियावर बुधवार पासूनच झळकू लागल्या. या जाहिरातीत उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र सहा क्रमांकावर तर आदित्य ठाकरे यांचे छायाचित्र सातव्या क्रमांकावर घेण्यात आले. त्यावरून शिवसैनिक नाराज झाले. नाराजीचा सूर सोशल मीडियातून व्यक्त होऊ लागला आहे.

"पाचर्णे उमेदवारी महायुतीची आहे. तुम्हाला आताच बाळासाहेबांचा विसर पडलेला दिसतो. उद्धव ठाकरे हे सहा नंबरचे नेते नाहीत. प्रोटोकॉल पाळावा लागेल नाही तर आम्हालाही विचार करावा लागेल. पक्षाने आदेश दिला तर आम्ही बांधील आहे. मात्र तो बरोबरीने असेल तर. आढळराव यांचे छायाचित्र तुम्ही अहवालात टाकले नाही. तुम्ही सर्व कामे युतीत केली. फक्त बी जे पी नाही. " असा संदेश सोशल मीडियावर फिरत आहे.
 
 मनसेचे संदीप सातव भाजप मध्ये
 
मनसेचे माजी तालुका प्रमुख संदीप सातव यांनी बुधवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व खासदार गिरीश बापट यांच्या उपस्तीतीत भाजप मध्ये प्रवेश केला. 
 
कंद अपक्ष लढणार
शिरूर हवेली तुन राष्ट्रवादीकडून इच्छुक असेलले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद याना उमेदवारी नाकारल्याने ते अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. ते आज ठराविक कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निर्णय घेणार आहेत. त्यांचा ' आमचं ठरलय आता ', हा मेसेज चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे ते लढतीलच असेच बोलले जाते. त्यांची ही बंडखोरी राष्ट्रवादीला डोकेदुखी ठरेल. ते उद्या अर्ज दाखल करणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena Activists are angry due to Thackeray father and son photo on the vidhan sabha 2019 campaign poster of Baburao Pacharne