काशेवाडीत खड्डयाची पुजा करुन शिवसेनेचे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv Sena agitation worshiping the pit Kashewadi Concretization road accident pune

काशेवाडीत खड्डयाची पुजा करुन शिवसेनेचे आंदोलन

कँटोन्मेंट : प्रभाग क्रमांक २७ मध्ये अवघ्या ४ महिन्यात तयार केलेल्या काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यावर पावसाळी गटार लाईनच्या चेंबरमुळे अनेक अपघात होत असून वारंवार तक्रार देऊन सुध्दा कोणत्याही प्रकारची दुरुस्ती अधिकारी करत नसल्याने क्षेत्रिय अधिकारी गणेश सोनुने आणि सहाय्यक अभियंता सिमरन पिरजादे यांच्या व पुणे महापालिकेच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. शिवसेने नेते जावेद खान यांच्या नेतृत्वाखाली खड्डयाची पुजा करुन हे आंदोलन करण्यात आलेपालिकेच्या अनागोंदी कारभाराच्या घोषणा ही यावेळी देण्यात आल्या.

तसेच रस्त्यावरच्या कामासाठी अनेक निविदा काढण्यात आल्या असून त्याची चौकशी करण्याची मागणी देखील यावेळी शिवसैनिकांनी केली. येत्या ७ दिवसात प्रभागातील बुजविण्यात न आल्यास शिवसेना स्टाईलने पुढील आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला . सदर आंदोलनात अनिल दामजी , पद्मा सोरटे , रमेश परदेशी , भारती दामजी , बाबा परदेशी , मुरली विलकर , गजानन देशमुख , सचिन घोलप , आदी उपस्थित होते.

Web Title: Shiv Sena Agitation Worshiping The Pit Kashewadi Concretization Road Accident Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top