भाजपवर मात करण्यासाठी शिवसेनेची व्यूहरचना 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

पुणे - आगामी महापालिका निवडणुकीत भाजपवर मात कशी देता येईल, या दृष्टीने शिवसेनेने व्यूहरचना आखण्यास सुरवात केली आहे. मनसेबरोबर युती झालीच, तर कोणत्या ठिकाणी फायदा होऊ शकतो, याची पडताळणी पक्षाकडून सुरू आहे.

याबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींचा असला, तरी यातून संभाव्य नफा-तोटा काय होऊ शकतो, याचा विचार शिवसेनेच्या शहर पातळीवरील नेत्यांकडून सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

पुणे - आगामी महापालिका निवडणुकीत भाजपवर मात कशी देता येईल, या दृष्टीने शिवसेनेने व्यूहरचना आखण्यास सुरवात केली आहे. मनसेबरोबर युती झालीच, तर कोणत्या ठिकाणी फायदा होऊ शकतो, याची पडताळणी पक्षाकडून सुरू आहे.

याबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींचा असला, तरी यातून संभाव्य नफा-तोटा काय होऊ शकतो, याचा विचार शिवसेनेच्या शहर पातळीवरील नेत्यांकडून सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मुंबईसह राज्यात कुठेच भाजपबरोबर युती न करण्याचा निर्णय पक्षप्रमुखांनी यापूर्वीच जाहीर केला आहे. या पार्श्‍वभूमीवर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मुंबईत युतीसंदर्भात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावरून शिवसेना-मनसे युतीबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. याबाबत कानोसा घेतल्यानंतर सध्या तरी मनसेकडून असा कोणताही प्रस्ताव आला नाही आणि तशी चर्चा नसल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले; परंतु युती झालीच, तर त्याचा फायदा शिवसेनेला कितपत होऊ शकतो, याची पडताळणी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

याबाबत मुंबई येथे मातोश्रीवर बैठक होणार आहे. यासाठी शहरप्रमुख विनायक निम्हण पुण्यातून गेले आहेत. या बैठकीमध्ये नव्याने काही पक्षप्रवेश, प्रभागनिहाय निश्‍चित केलेली प्रारूप उमेदवारांची यादी आणि मनसेसोबतच्या युतीसंदर्भात चर्चा होण्याची शक्‍यता आहे. संभाव्य युती ग्राह्य धरून तयार केलेला ढोबळ आराखडादेखील पक्षनेत्यांपुढे मांडण्यात येणार आहे. 

मनसेने घेतला होता अंदाज 
शहर मनसेमध्ये शिवसेनेसोबतच्या युतीसंदर्भात माहिती घेतली असता, असा कोणताही प्रस्ताव आम्ही दिलेला नाही. नेत्यांकडून सूचना आल्या तर काय करायचे, याचा निर्णय घेऊ. युती करायचीच असेल, तर पक्षाचे विद्यमान नगरसेवक आहेत, तेवढ्या जागांसाठी आमचा आग्रह राहील. त्याउपर शिवसेना ज्या जागा देण्यास तयार आहे, त्या घेण्याची आमची तयारी आहे. मध्यंतरी मुंबईतील नेत्यांनी पुण्यातील युतीसंदर्भात अंदाज घेतला होता, असेही सांगण्यात आले. 

इच्छुकांना ओढण्याचा डाव 
भाजप-शिवसेना युती होणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे, तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आघाडीवरून अद्याप चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. आघाडी झाली, तर या दोन्ही पक्षांतील इच्छुक आपल्या जाळ्यात अडकतील, या अपेक्षेने शिवसेना-भाजप आणि मनसे या तिन्ही पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यास विलंब केला जात आहे. दोन्ही कॉंग्रेसकडून आघाडीबाबतचे घोंगडे भिजत ठेवण्यामागे हेदेखील एक कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Shiv Sena and BJP on strategy to overcome