शिवसेनेचे उमेदवार निश्‍चित 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

पुणे - तीन ते चार प्रभाग वगळून शिवसेनेकडून उर्वरित सर्व प्रभागांतील उमेदवारांची नावे निश्‍चित करण्यात आली असून, बंडखोरी टाळण्यासाठी थेट क्षेत्रीय कार्यालयात उद्या (शुक्रवारी) पक्षाकडून एबी फॉर्म दिले जाणार आहेत. त्यामुळे पक्षातील इच्छुकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, ज्या प्रभागात एकमत नाही, त्यांच्याबाबतचा निर्णय "मातोश्री'वर सोपविण्यात आला असल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले. क्षेत्रीय कार्यालयांनुसार पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या माध्यमातून एबी फॉर्म पोचविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या अंतिम मुदत आहे. त्यामुळे आज पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर होईल, अशी शक्‍यता व्यक्त केली जात होती; मात्र शहर पदाधिकाऱ्यांनी निश्‍चित केलेल्या यादीबाबत थेट "मातोश्री'पर्यंत तक्रारी गेल्या होत्या. त्यामुळे अंतिम यादीसाठी पक्षश्रेष्ठींनी सचिव आणि खासदार विनायक राऊत यांच्यावर जबाबदारी सोपवली. राऊत आज सकाळी पुण्यात दाखल झाले. त्यांनी शहरातून निश्‍चित केलेली नावे आणि प्रभागनिहाय इच्छुक उमेदवारांना हॉटेलवर बोलावून घेतले. चर्चा करून आणि सहमती घडवून उमेदवारांची नावे प्रभागनिहाय निश्‍चित केली. काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी निश्‍चित करताना कशा प्रकारे डावलले गेले आहे, याची तक्रारदेखील राऊत यांच्याकडे केली. उमेदवार यादीत नावे असलेले; परंतु मतदार यादीमध्ये नाव नसलेले दोन ते तीन उमेदवार असल्याचे निदर्शनास आले. 

सकाळी सुरू झालेली ही बैठक दुपारी उशिरापर्यंत सुरू होती. नावे निश्‍चित करण्यात आलेल्या उमेदवारांना बोलावून थेट कामाला सुरवात करण्याच्या सूचना 
देण्यात आल्या, तर काही जणांना दूरध्वनी करून अर्ज भरण्याचे आदेश देण्यात आले; मात्र प्रभाग क्रमांक 12, 13 सह तीन ते चार प्रभागांतील उमेदवारीवरून एकमत होत नसल्यामुळे त्यांचा निर्णय मातोश्रीवर घेण्याचे ठरले. 

विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी 
अन्य पक्षांतून दाखल झालेल्या विद्यमान नगरसेवकांनादेखील पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे, तर सध्याचे पक्षाचे विद्यमान, तसेच माजी नगरसेवक असलेल्या जवळपास सर्वांना उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे. काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून, अद्यापही राष्ट्रवादी, मनसेचे पदाधिकारी आणि नगरसेवक पक्षात येण्याच्या तयारीत असून, त्याबाबत रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. 

संभाव्य शिवसेना उमेदवारांची यादी 
अशोक हरणावळ, सचिन भगत, बाळा ओसवाल, राजू पवार, सोनम झेंडे, सनी निम्हण, विजय मारटकर, विशाल धनवडे, निरंजन दाभेकर, मयूर कडू, चेतन चव्हाण, गजानन बधे, कल्पना थोरवे, बापू निंबाळकर, मनीष जगदाळे, महेश पोकळे, संगीता ठोसर, प्रमोद भानगिरे, तानाजी लोणकर, मनीषा साळुंखे, विजया कापरे, भरत कुंभारकर, अमोल रासकर, सागर माळकर, मयूर वांजळे, संजय निम्हण, विनोद ओरसे, विजय देशमुख, महादेव बाबर यांची पत्नी स्मिता, भरत चौधरी, उमेश वाघ यांची पत्नी, नीलिमा पवार, बाळासाहेब मालुसरे, अश्‍विनी शिंदे, मोहन परदेशी यांची पत्नी, अमित जगताप, प्रभावती बोरकर आदी. 

Web Title: Shiv Sena candidate decided