Pune : मंचरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना कार्यकर्त्यांचा जल्लोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv Sena celebrated issue

Pune : मंचरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना कार्यकर्त्यांचा जल्लोष

डी. के वळसे पाटील

मंचर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह दिल्यामुळे मंचर (ता. आंबेगाव) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून व फटक्याची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला.

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले व भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील जिंदाबाज च्या घोषणा देऊन आनंद साजरा केला.

यावेळी योगेश बाणखेले, स्वप्नील बेंडे पाटील, संतोष डोके,शिवाजी राजगुरू, मालन थोरात, सविता क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

सुनील बाणखेले म्हणाले “निवडणूक आयोगाने दिलेला निकाल हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विजय झाला आहे.

या पुढील काळात माजी खासदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिरूर लोकसभा मतदार संघात शिवसेनेत इनकमिंग मोठ्या प्रमाणात होणार आहे. मंचर नगरपचायत निवडणुकीत धनुश्याबानाची सरशी होऊन भगवा फडकणार आहे.