बालेकिल्ल्यातच शिवसेना पराभूत

सुशांत सांगवे - @sushantsangwe  
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

कोंढवा खुर्द-मीठानगर (प्रभाग क्रमांक २७), कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी (प्रभाग ४१) आणि अप्पर-सुपर इंदिरानगर (प्रभाग ३७) या तीन प्रभागांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव राहिला, तर शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अनुक्रमे दोन व एका जागेवर समाधान मानावे लागले. बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोंढव्यात शिवसेनेला बसलेला धक्का आणि आमदार योगेश टिळेकर यांच्यासाठी प्रतिष्ठेचा असलेला प्रभाग ४१ मध्ये भाजपला शिवसेनेच्या उमेदवारांबरोबर करावा लागलेला संघर्ष हाच बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील चर्चेचा मुद्दा होता. 

मनसेचे शहरातील खाते उघडून साईनाथ बाबर यांनी कोंढवा-मीठानगर या प्रभागात ‘ड’ गटामध्ये पहिल्या फेरीपासून स्पष्ट मताधिक्‍य मिळवले. साईनाथ यांना ९५८९ मते मिळाली. त्यांच्या विरोधात लढणाऱ्या राष्ट्रवादीच्या रईस सुंडके यांना ८६३९ मते मिळाली. भाजपच्या महेंद्र गव्हाणे यांना २९५० मते मिळून ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. याच प्रभागात ‘क’ गटामध्ये माजी नगरसेवक भरत चौधरी यांच्या पत्नी सीमा चौधरी यांनीही दोन फेऱ्यांमध्ये आघाडी घेत ६०९९ मते मिळविली; मात्र त्यांना राष्ट्रवादीच्या हमीदा सुंडके यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. हमीदा यांना ८०६६ मते मिळाली, तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मनसेच्या सुप्रिया शिंदे यांना ४३८७ मते मिळाली. ‘ब’ गटामध्ये माजी आमदार महादेव बाबर यांच्या पत्नी स्मिता बाबर यांचा धक्कादायक पराभव झाला. त्यांना ७१८७ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या परवीन शेख यांनी ८३६२ मते मिळवत स्मिता बाबर यांना पराभूत केले. तिसऱ्या क्रमांकावर मनसेच्या शबाना शेख राहिल्या व त्यांना ३७२४ मते मिळाली. ‘अ’ गटामध्ये शिवसेनेचे अमर पवळे यांना ५३७४ मते मिळाली व त्यांना राष्ट्रवादीचे अब्दुल गफूर पठाण यांनी ९७६८ मते मिळवत पराभूत केले. 

कोंढवा-येवलेवाडी या प्रभागातील ‘ड’ गटामध्ये रंजना टिळेकर यांना ११८२४ मते मिळाली, तर शिवसेनेचे गंगाधर बधे यांना ११४९० मते मिळाली. केवळ ३३४ मतांनी आमदार योगेश टिळेकर यांच्या मातुःश्री जिंकल्या. ‘ब’ गटामध्ये शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका संगीता ठोसर यांनी १०९५२ मते घेत विजय मिळविला. भाजपच्या सुवर्णा मारकड यांना १०७७१ मते मिळाली. केवळ १८१ मतांनी त्यांचा पराभव झाला. ‘अ’ गटामध्ये वीरसेन जगताप यांना १०७६५ मते मिळून ते विजयी ठरले, तर शिवसेनेच्या रमेश गायकवाड यांना ७५५० मते मिळाली. ‘क’ गटामध्ये भाजपच्या वृषाली कामठे यांनी ११८३६ मते मिळवून सहज विजय नोंदविला. शिवसेनेच्या मनीषा कामठे यांना ८९०० मते मिळाली व त्या दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या. 

अप्पर इंदिरानगर प्रभागामध्ये रूपाली दिनेश धाडवे यांनी ‘ब’ गटामध्ये १२५१४ मते मिळवून एकहाती विजय मिळविला. त्यांच्या पाठोपाठ शिवसेनेच्या शारदा भोकरे यांना ५००९ मते मिळाली. ‘अ’ गटामध्ये ८४१३ मते मिळून भाजपच्या वर्षा साठे विजयी झाल्या. त्यांच्याविरोधात लढणाऱ्या शिवसेनेच्या बालिका जोगदंड यांना ६११७ मते मिळाली. ‘क’ गटामध्ये शिवसेनेचे बाळा ओसवाल आणि भाजपचे गौरव घुले यांच्यामध्ये संघर्ष झाला. ओसवाल यांना ९८२० मते मिळाली, तर घुले यांना ८३३९ मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मनसेच्या राहुल गवळी यांना २७७१ मते मिळाली. 

Web Title: shiv sena defeated in balekilla