दणक्‍यासाठी शिवसेनेची फिल्डिंग 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

पुणे - "इनकमिंग'मध्ये मित्रपक्ष असलेला भाजप आघाडी घेत असताना शिवसेनेनेही त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित करून एकावेळी इच्छुकांना प्रवेश देत दणका देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी येत्या आठ ते दहा दिवसांतील मुहूर्त काढण्यात आला आहे. 

महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यातुलनेत शिवसेनेच्या पातळीवर संथ हालचाली सुरू आहेत. परंतु, अन्य पक्षांतून शिवसेनेत प्रवेशासाठी इच्छुकांची संख्याही मोठी आहे. मात्र, या सर्वांना सध्या पक्षाकडून थांबविण्यात आले आहे. एका मेळाव्याचे आयोजन करून त्यामध्ये इच्छुकांचा जाहीर प्रवेश घडवून आणण्याची तयारी पक्षाकडून सुरू आहे. मुंबई येथे आज झालेल्या राज्यस्तरीय बैठकीसाठी शहराचे काही पदाधिकारी गेले होते. या बैठकीनंतर या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांची भेट घेतली. पक्षाची तयारी, प्रवेश करणाऱ्या इच्छुकांची माहिती या वेळी पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांना दिली. तसेच, त्यासाठी पुण्यात येण्याची विनंती केली. त्यास ठाकरे यांनीही अनुकूलता दर्शविली आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या आठ ते दहा दिवसांत या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून, त्यामध्ये मित्रपक्ष भाजपसह अन्य पक्षांना दणका देण्याचे नियोजन करण्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. 

या संदर्भात पक्षाचे शहरप्रमुख विनायक निम्हण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. ते म्हणाले, ""पुणे शहरासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्यासोबत स्वतंत्र बैठक झाली, त्यामध्ये त्यांनी पुण्याची माहिती घेतली. लवकरच एका मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून, तेथे मार्गदर्शनासाठी येण्यास त्यांनी तयारी दर्शविली आहे. कॉंग्रेस आणि मनसेचे काही नेते, पदाधिकारी प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. मेळाव्यात त्यांच्याबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल.''

Web Title: Shiv Sena Fielding