Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांचा राहूत जाहीर निषेध सभा.. जोडो मारो आंदोलन... Shiv sena Sanjay Raut public protest MLA Rahul Kul politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv sena Sanjay Raut public protest MLA Rahul Kul

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांचा राहूत जाहीर निषेध सभा.. जोडो मारो आंदोलन...

राहू : आमदार राहुल कुल यांच्या राहू गावात राऊतांना जोडे मारो आंदोलन करून त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. भीमा पाटस कारखान्यामध्ये सुमारे 500 कोटीचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांच्यावर केला असून त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात आमदार राहुल कुल यांच्या राहू (ता.दौंड) येथील गावात जोडे मारो आंदोलन करत त्यांचा निषेध करण्यात आला.

या निषेध सभेसाठी राहू बेटपरिसरातील राहू, पिलाणवाडी, टेळेवाडी,कोरेगाव भिवर,वाळकी, दहीटणे, मिरवडी, देवकरवाडी, पाटेठाण,सहजपूर,नांदूर येथील अनेक नागरिक सहभागी झाले होते. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी सोनवणे म्हणाले, आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नामुळे भीमा पाटस कारखाना सुरू झाला असून तालुक्यातील काही विरोधकांच्या पोटात गोळा आला आहे.

कुल यांचे कर्तृत्व विरोधकांना पाहवत नाही. राऊत हे पोपटपंची करण्यात पटाईत आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे म्हणाले, भीमा पाटस अडचणीत यायला विरोधकच खरे जबाबदार असल्याचे टीका रमेश थोरात यांचे नाव न घेता सडकून टीका केली. त्यांना कुल कुटुंबियाचं कर्तृत्व सहन होत नाही.

फुले यांच्यावरील बिनबुडाच्या आरोपाच्या निषेधार्थ तालुक्यातील जनतेच्या वतीने महामोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात येणार असल्याचे ताकवणे यांनी सांगितले. मारूती मगर म्हणाले, राऊत यांचे आरोप बिनबुडाचे आहे., दौंडची जनता कुल यांच्या पाठीशी उभी राहिल. जनता दुध खुळी नाही.

यावेळी सरपंच दिलीप देशमुख,कैलास गाढवे, डॉ. विलास भंडारी, देविदास डुबे, संपतराव डुबे, युवराज बोराटे,मनीषा नवले, दादा कोळपे, जयश्री जाधव,रोहिदास टिळेकर, रोहिदास कंद, विठ्ठल थोरात,सुधाकर थोरात, आनंद कदम,पृथ्वीराज जगताप आदींची भाषणे झाली.

याप्रसंगी राहूबेट परिसरातील भाजपचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक अरुण नवले यांनी केले. गणेश चव्हाण यांनी आभार मानले. राहू ग्रामस्थांच्या वतीने यावेळी यवत पोलिसांना निवेदन देण्यात आले.