सर्वसामान्यांना न्याय देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न : आढळराव पाटील 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

न्हावरे : सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न शिवसेना करीत असल्याचे प्रतिपादन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले. न्हावरे (ता. शिरूर) येथे त्यांनी ग्रामस्थांनी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच रोहिणी कोरेकर होत्या. 

आढळराव म्हणाले, की सध्याच्या लोकप्रतिनिधी आपल्या कर्तव्याचा विसर पडत चालला आहे. काही लोकप्रतिनिधी शासनदरबारी कमी मात्र औद्योगिक वसाहतीत जास्त वेळ देत असल्याचे दिसून येते. या वेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना मतदारांबरोर संपर्क साधून त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले. जयश्री पलांडे म्हणाल्या, कॉंग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने सत्तेत असताना सर्वसामान्यांची कामे न केल्याने मतदारांनी त्यांना घरी बसवले. राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन म्हणजे एक प्रकारची नौटंकी आहे. 

या प्रसंगी जिल्हा भाजप किसान सेलचे उपाध्यक्ष सुभाष कांडगे, शिवसेनेचे विभागप्रमुख बिरदेव शेंडगे, बापूसाहेब काळे यांची भाषणे झाली. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, किरण देशमुख, तालुकाप्रमुख पोपट शेलार, शिरूर शहरप्रमुख संजय देशमुख, महिला आघाडीच्या चेतना ढमढेरे, भाजप अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष हमीद पठाण, दीपक कोकडे, शहाजी जाधव, अनिल कोरेकर, संभाजी साळुंके, शरद जाधव उपस्थित होते. 
 
Web Title: Shiv Senas try to give justice to common people says Shivajirao Adhalrao Patil