महाराजांचे जीवनकार्य प्रेरणादायी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणारे प्रवीण शिरोळे यांची भावना 
पुणे - '‘वडिलोपार्जित कोणतेही राज्य नसताना स्वत:हून सीमेपलीकडे जाऊन हिंदवी स्वराज्याची निर्मिती शिवाजी महाराजांनी केली. यातूनच नेहमी सर्वांना प्रेरणा मिळत आली आहे. शिवाजी महाराजांचे चरित्र, पराक्रम, शूरता, निर्णयक्षमता यातून प्रेरणा घेऊन नव्या पिढीने वाटचाल करावी,’’ अशी भावना गेली ३२ वर्षे ‘जाणता राजा’मध्ये महाराजांची भूमिका साकारणारे प्रवीण शिरोळे यांनी व्यक्त केली. 

छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणारे प्रवीण शिरोळे यांची भावना 
पुणे - '‘वडिलोपार्जित कोणतेही राज्य नसताना स्वत:हून सीमेपलीकडे जाऊन हिंदवी स्वराज्याची निर्मिती शिवाजी महाराजांनी केली. यातूनच नेहमी सर्वांना प्रेरणा मिळत आली आहे. शिवाजी महाराजांचे चरित्र, पराक्रम, शूरता, निर्णयक्षमता यातून प्रेरणा घेऊन नव्या पिढीने वाटचाल करावी,’’ अशी भावना गेली ३२ वर्षे ‘जाणता राजा’मध्ये महाराजांची भूमिका साकारणारे प्रवीण शिरोळे यांनी व्यक्त केली. 

‘सकाळ माध्यम समूहा’ने पिंपरी येथील हिंदुस्तान ॲन्टिबायोटिक्‍सच्या (एचए) मैदानावर ९ ते १३ नोव्हेंबरदरम्यान रोज संध्याकाळी ६.३० वाजता ‘जाणता राजा’चे आयोजन केले आहे. या खास प्रयोगाद्वारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित-दिग्दर्शित हे महानाट्य अनुभवण्याची संधी पिंपरी-चिंचवड परिसरातील इतिहासप्रेमींना मिळणार आहे. त्यानिमित्ताने ‘जाणता राजा’तील शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे प्रवीण शिरोळे यांच्याशी संवाद साधला.

‘‘मराठी रंगभूमीच्या इतिहासातील पहिल्या अतिभव्य महानाट्यात शिवाजी महाराजांची भूमिका करणे हे खूपच आव्हानात्मक होते. सुरवातीला बाबासाहेबांच्या आग्रहाखातर ही भूमिका करायला सुरवात केली. त्यातून एक ऊर्जा मिळत गेली आणि वयाच्या २३ व्या वर्षापासून यात बेभानपणे काम केले. लहानपणीच शिवचरित्र तोंडपाठ होते. माझ्या आजोबांपासूनच तो वारसा मला मिळत गेला. त्याचबरोबर शिवशाहीर बाबासाहेब व आमच्या घराण्याचे जवळचे संबंध आहेत. यातूनच हा प्रवास सुरू झाला.’’ 

शिरोळे म्हणाले, ‘‘माझी निवड झाली तेव्हा मी कॉलेजला होतो, फिटनेस तर होता; पण बेसिक प्रशिक्षण मला घ्यावेच लागले. रंगमंचावर उभे राहणे, बोलणे याचे धडे मला आमचे ‘जाणता राजा’चे पहिले दिग्दर्शक दिवाकर राव पांडे यांनी दिले. राजाभाऊ म्हैसकर व बाबासाहेबांनी माझ्यावर प्रचंड मेहनत घेतली.’’ ते म्हणाले की, ‘‘सुरवातीला मला भीती नाही वाटली, पण प्रत्येक प्रयोगातून मी घडत गेलो, तरीही आज प्रत्येक प्रयोग करताना दडपण येतेच असते; त्याचबरोबर प्रयोग करताना प्रेक्षकांची दाद मिळाली की खूप आनंद होतो.’’

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा उलगडणाऱ्या ‘जाणता राजा’ या वैभवशाली महानाट्याचे पाच विशेष प्रयोग पिंपरीमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. त्यासाठीची तिकीटविक्री चालू झाली असून, आठ केंद्रांवर तिकिटे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. याशिवाय ऑनलाइन तिकीटविक्रीही सुरू झाली आहे.

दीडशे कलावंतांचा समावेश असलेल्या या प्रयोगाकरिता पाच मजली फिरता रंगमंच असून, या महानाट्याच्या प्रयोगाचे ‘ऐश्‍वर्यम हमारा’ हे टायटल स्पॉन्सर आहेत. तसेच राजेश पिल्ले स्पोर्टस्‌ ॲकॅडमीचे राजेश पिल्ले, राजमुद्रा ग्रुपचे राजू मिसाळ, शिवक्रांती कामगार संघटनेचे ॲड. विजय पाळेकर, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट हे एज्युकेशन पार्टनर आणि काटे ॲक्वा हे बिव्हरेज पार्टनर आहेत. कोल केअर सेंटरचे ओंकार इंजिनियरींग वर्क्स प्रा. लिमिटेड हे जेनसेट सर्व्हिस पार्टनर, हॉटेल गजाली रेस्टॉरंट पार्टनर आणि गिरीकंद ट्रॅव्हल्स हे ट्रॅव्हल पार्टनर आहेत. त्यासाठी २५०० सोफा, ७५० रुपये प्लॅटिनम, ५०० रुपये गोल्ड आणि ३०० रुपये सिल्व्हर असा तिकीटदर आहे. 

प्रवेशिका उपलब्ध असलेली ठिकाणे
वेळ ९ ते ११.३० आणि सायंकाळी ५ ते ८
बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह-कोथरूड आणि रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह-चिंचवड, वेळ १० ते ६.
अंकुशराव लांडगे सभागृह भोसरी, आचार्य अत्रे सभागृह पिंपरी, पंडित भीमसेन जोशी सभागृह औंध, सकाळ कार्यालय पिंपरी.
होम डेकॉर - जगताप डेअरी, पिंपळे सौदागर.
अभय ॲडस्‌- चाफेकर चौक, चिंचवड.
दिनेश ॲडव्हर्टायझिंग- बिग इंडिया चौक, सेक्‍टर २५, निगडी प्राधिकरण.
शब्द कम्युनिकेशन- जिजामाता चौक, तळेगाव दाभाडे.
लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटीच्या शाखा.
चिंचवड - थिटे बिल्डिंग, तानाजीनगर, चिंचवड.
निगडी- शॉप नं ३८४, सेक्‍टर २७, अमरदीप स्वीटसजवळ, प्राधिकरण, निगडी.
चाकण- छत्रपती शिवाजी चौक, कोहिनूर सेंटरच्या समोर, पुणे-नाशिक रोड, चाकण. 

कुठे : हिंदुस्तान ॲन्टिबायोटिक्‍सच्या (एचए) मैदानावर, पिंपरी
कधी : ९ ते १३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६.३० वाजता
ऑनलाइन बुकिंग : Tixdo.com/janataraja
अधिक माहितीसाठी : ९१४६६०२५५७, ९५४५९५४७३३,
८८८८९७७९०७.

Web Title: Shivaji Maharaj inspiring life work