शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण

शिवाजीनगर - छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, विजय काळे आदी.
शिवाजीनगर - छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, विजय काळे आदी.

पुणे - ‘समाज एकरूप, जिवंत आणि कायमस्वरूपी तरुण ठेवण्यासाठी श्री शिवाजी व्यायाम मंडळाच्या माध्यमातून अनेक प्रयत्न केले जात आहेत. शिवाजी महाराजांची प्रतिमा पाहिली की शरीरात स्फूर्ती येते. या स्फूर्तीमधून माणूस कुठल्याही पक्षाचा असला तरी चांगल्या कार्यासाठी एकत्र येतो,’’ असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. 

श्री शिवाजी व्यायाम मंडळाच्या मैदानातील इमारतीमध्ये बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी बापट बोलत होते. आमदार विजय काळे, नगरसेविका जोत्स्ना एकबोटे, नीलिमा खाडे, नगरसेवक आदित्य माळवे, योगेश समेळ, मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर दुर्गे, शांताराम कुंजीर, श्रीकांत शिरोळे आदी उपस्थित होते. खेळांमध्ये विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. नगरसेविका एकबोटे यांच्या विकासनिधीतून १० लाख रुपयांचे व्यायामाचे साहित्य मंडळाला दिले.
बापट म्हणाले, ‘‘श्री शिवाजी व्यायाम मंडळाने ज्येष्ठ नागरिक संघ, मुला-मुलींचे वाचनालय, शाहू महाराजांच्या नावाने संशोधन व व्यायामशाळा आदींच्या माध्यमातून मोठे काम उभे केले आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com