गिरीश बापट शकुनीमामा; शिवसेनेच्या खासदाराचा वार

Shivajirao Adhalrao Patil Crirticise on Girish Bapat in Chakan
Shivajirao Adhalrao Patil Crirticise on Girish Bapat in Chakan

चाकण : जिल्ह्यात शिवसेनेचे उमेदवार पडण्यामागे खासदार बापट कारणीभूत आहेत. ते शकुनीमामा आहेत. मित्रपक्षाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. आम्ही केलेल्या कामांचे श्रेयदेखील त्यांनी आम्हाला मिळू दिले नाही. आमदार गोरे यांचा पराभव होण्यामागे बापट हे शकुनीमामा आहेत. बापटांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना फोन करून बंडखोर उमेदवाराचे काम करा, असे सांगितले. असा घणाघाती आरोप माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात केला. खेड तालुका शिवसेनेच्या वतीने भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.

आढळराव पाटील म्हणाले, "खेड तालुक्‍यातील निष्क्रिय कार्यकर्त्यांना घरी बसविले पाहिजे. नव्या नियुक्‍त्या केल्या पाहिजेत. कार्यकर्ते नुसते पद घेतात आणि त्यांच्या गावात मतदान विरोधी उमेदवाराला अधिक होते. खेडच्या पश्‍चिम डोंगराळ भागात माजी आमदार सुरेश गोरे यांना विकासकामे करूनही कमी मते पडली.

खेड तालुक्‍यात पक्षसंघटना बळकट होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.'' माजी आमदार सुरेश गोरे म्हणाले, "मी मला भाई म्हणा असे का म्हणालो, तर ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्यासाठी मी यापुढे भाई होणार आहे. जे अन्याय करतात, तालुक्‍यात दादागिरी करतात त्यांना त्यांची जागा दाखविणार आहे.'' या वेळी माउली कटके, रामदास धनवटे, अशोक खांडेभराड, विजया शिंदे, राजेश जवळेकर, किरण मांजरे आदी उपस्थित होते.

दादा, तुम्ही पालकमंत्री व्हा...
माजी आमदार गोरे यांनी त्यांच्या भाषणात माजी खासदार शिवाजीदादांनी आता पालकमंत्री झाले पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवायची असेल, पक्षसंघटना बळकट करायची असेल तर आढळराव पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री झाले पाहिजे, असे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com