पुण्यातील शिवणे नांदेड पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद

Shivane Nanded bridge close down due to overflow of water
Shivane Nanded bridge close down due to overflow of water

शिवणे (पुणे) : खडकवासला धरणातील पाण्याचा विसर्ग 14 हजार क्यूसेक पर्यत वाढल्याने शिवणे नांदेडचा पूल पाण्याखाली गेल्याने गुरुवारी वाहतूक बंद केली होती. पाण्याचा विसर्ग वाढविल्याने ही बंदी कायम राहिल. उत्तमनगर व हवेली पोलिसांनी ही वाहतूक पर्यायीमार्गे वळविली. 

शिवणे- नांदेड दरम्यानचा मुठा नदीवरील हा पूल कमी उंचीचा व अरुंद पूल आहे. साधारण सात आठ हजार क्यूसेक पेक्षा जास्त पाणी सोडल्यास तो पूल पाण्याखाली जातो. शिवण्याकडून जाणारी वाहतूक प्रामुख्याने नांदेड धायरीकडे जाते. त्यामुळे, उत्तमनगर, कोंढवे धावडे, मुठा नदीपूल खडकवासला मार्गे वाहतूक वळविली मागवली असे उत्तमनगरचे पोलीस निरीक्षक उदयसिंह शिंगाडे यांनी सांगितले. 

नांदेडहुन शिवणे, वारजे, कोथरूड हिंजवडीकडे जाणारे वाहनचालक हा पूल वापरतात. त्यांना सिंहगड रस्ता बाह्यवळण मार्गे वाहतुक वळविल्याचे हवेलीचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com