शिवापूरला रोज ३५ टक्के वाहने टोल फ्री

khed-shivapur
khed-shivapur

खेड-शिवापूर - खेड-शिवापूर टोल नाक्‍यावर हवेली (पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड), भोर, वेल्हा, पुरंदर, मुळशी या तालुक्‍यातील वाहनांना टोल फ्री सोडण्याच्या निर्णयामुळे गेल्या आठवडाभरात सुमारे एक लाख वाहने टोल फ्री गेली आहेत. टोल नाक्‍यावरून दररोज जाणाऱ्या एकूण वाहनांपैकी ३५ टक्के वाहने टोल फ्री जात असल्याची माहिती टोल प्रशासनाने दिली. 

टोलनाका पीएमआरडीए हद्दीबाहेर हलविण्यात यावा, या मागणीसाठी खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीतर्फे गेल्या रविवारी टोल नाक्‍यावर आंदोलन करण्यात आले. या वेळी या मागणीबाबत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बैठक आयोजित करून त्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत हवेली (पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड), भोर, वेल्हा, पुरंदर आणि मुळशी तालुक्‍यांतील वाहनांना टोल फ्री सोडण्याचे आश्‍वासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पुणे सातारा टोल रोड कंपनीने दिले. त्यानुसार गेल्या आठवड्यापासून येथील टोल नाक्‍यावर या पाचही तालुक्‍यांतील वाहनांना टोल फ्री सोडण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com