शिवरायांचा अमेरिकतही जयजयकार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

केशवनगर - अमेरिकेतील छत्रपती फाउंडेशनच्या वतीने न्यूयॉर्क येथील जगप्रसिद्ध टाइस्मस्केअर येथे उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. महाराष्ट्रीयन तरुण-तरुणींसह देशभरातील विविध राज्यांतील नागरिक या उत्सवात सहभागी झाले होते.

केशवनगर - अमेरिकेतील छत्रपती फाउंडेशनच्या वतीने न्यूयॉर्क येथील जगप्रसिद्ध टाइस्मस्केअर येथे उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. महाराष्ट्रीयन तरुण-तरुणींसह देशभरातील विविध राज्यांतील नागरिक या उत्सवात सहभागी झाले होते.

महाराष्ट्रीय नागरिकांनी एकत्र येत स्थापन केलेल्या छत्रपती फाउंडेशनतर्फे तीन वर्षांपासून तेथे शिवजयंती उत्सव साजरा केला जात आहे. फाउंडेशनचे प्रमुख स्वप्निल खेडेकर, अध्यक्ष विनोद झेंडे, उपाध्यक्ष महेंद्र सिनारे, युवती अध्यक्ष  माधुरी झिंजुर्डे, संपर्कप्रमुख मुज्जुमिल्ल मुकादम, प्रवीण निकम, अक्षय नाईक, रूपेश नाईक, प्रशांत भुसारी, अदिती भुतेकर, सुरेश गायकवाड, केशरी मुद्रस, रोहन डाबरे, रोहन चौधरी, महेश शिंदे, सतीश बोंबले, कल्पेश चौधरी, नकुल देशपांडे, श्रुती पाटील, रूपेश भाटकर, मयूर शिंदे, प्रतिका पटेल, आकाश शाह, विशाल शिलवंत यांनी उत्सवाचे संयोजन केले. 

विविध सास्कृंतिक कार्यक्रमांसह ‘जॉब मार्केट ईन अमेरिका’, ‘एच १ बी वीजा’ आणि ‘अमेरिकेतील नोकरी व व्यवसाय’ या संदर्भातील माहिती युवकांना देण्यासाठी शिबिर आयोजित केले होते. यामध्ये न्यूयॉर्क विद्यापीठ, पेस  विद्यापीठ, ब्रिजपोर्ट विश्वविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. मुळचे केशवनगरचे पण सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेले कनेक्‍टिव्ह स्टेट अध्यक्ष प्रवीण निकम यांनी दूरध्वनीवरून ‘सकाळ’ला या बाबत माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘छत्रपती फाउंडेशनच्या माध्यमातून अमेरिकेत आम्ही भारतीय महापुरुषांचा जयंती उत्सव साजरा करतो. यातून आपल्या महापुरुषांची ओळख जगाला होते. या कार्यात महाराष्ट्रातील तरुणांसोबत गुजरात, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, केरळ, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बंगाल या प्रांतातील तरुणही सहभागी होत आहेत. यातून जागतिक स्तरावर राष्ट्रीय एकजूट निर्माण होत आहे.’’ 

Web Title: shivjayanti celebration in america