शौर्यगाथेने लोणावळेकर रोमांचित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

लोणावळा - छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या शौर्यगाथेने लोणावळेकर रोमांचित झाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजे या दोन महायोद्‌ध्यांचा सळसळता इतिहास प्रेक्षकांना अनुभवता आला. 

निमित्त होते लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र प्रस्तुत, प्रवीण देशमुख निर्मित, तसेच रणरागिणी ग्रुप व लोणावळा विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित महानाट्याचे. डॉ. बी. एन. पुरंदरे विद्यालयाच्या मैदानावर आयोजित या महानाट्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

प्रसिद्ध सिनेअभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेने महानाट्यात रंगत आणली. खासदार श्रीरंग बारणे, रणरागिणी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा मंजूश्री वाघ, लोणावळा विकास प्रतिष्ठानचे संस्थापक मुकेश परमार, बाळासाहेब कडू, तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जीवन गायकवाड, भाजपचे शहराध्यक्ष बाबा शेट्टी, महानाट्यांचे निर्माते प्रवीण देशमुख, रणरागिनी ग्रुप, लोणावळा विकास प्रतिष्ठान सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलव व शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून महानाट्याला सुरवात झाली.

अपरिचित इतिहास अवतरला
महानाट्यादरम्यान शंभर फुटी दुमजली भव्य रंगमंच, एक हजार कलाकार, जिवंत तोफा, आक्रमक शौर्य लढाया, रंगमंचावर प्रत्यक्ष हत्ती, घोडे, उंट यांचा वावर यासह छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास सादर होताना प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. महाराजांचा जीवनपट, राज्याभिषेक सोहळा, अपरिचित इतिहास या महानाट्याच्या माध्यमातून समोर आला. 

Web Title: Shivrajyabhishek Mahanatya