कांद्याच्या प्रश्नाला भाजप बरोबर शिवसेनाही जबाबदार  : प्रभाकर बांगर 

डी.के.वळसे पाटील 
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

मंचर : "राज्य सरकारने कांद्याला प्रती किलो दोन रुपये अनुदान देण्याचा घेतलेला निर्णय हास्यास्पद आहे. त्यातून शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च भागणार नाही. कांदा उत्पादक व शेतकऱ्याना देशोधडी लावण्याच्या पापात भारतीय जनता पक्षाप्रमाणे शिवसेनाचाही सहभाग आहे. पाकिस्तानचे खेळाडू व कलाकार शिवसेनेला चालत नाहीत. पण पाकिस्तान मधून आयात केलेला कांदा कसा चालतो. शिवसेनेने कांदा आयातीला विरोध न करता बघ्याची भूमिका घेतलेली आहे.'' अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुक्याचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी केली. 

मंचर (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (ता. २०) पुणे-नाशिक रस्त्यावर बांगर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन केले. यावेळी राज्य शासनाने प्रती किलोला दोन रुपये अनुदान देण्याच्या निर्णयाचा संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रत्यावर कांदा फेकून निषेध केला. बाजार समिती पासून भाजप-शिवसेना सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर सभा झाली. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा विभागाचे गजानन पाटील, काळूराम कड, जयप्रकाश परदेशी, यशवंत इंदोरे गुरुजी, वनाजी बांगर यांची भाषणे झाली. पंकज पोखरकर यांनी आभार मानले. सभेनंतर पुणे-नाशिक रस्त्यावर बाजार समिती समोर कांदे रस्त्यावर टाकून शेतकऱ्यांनी आंदोलन केले. 

"केंद्र सरकारने कांदा, बटाट्याचा जीवनावश्यक कायद्यात समावेश केला. त्यावेळी याभागातील खासदार काय करत होते. कांदा प्रश्नासाठी त्यांनी कधीही संसदेत आवाज उठवला नाही. किंवा संसद बंद पाडली नाही. शेतकऱ्यांविषयी त्यांना कसलीही आस्था नाही. भंगार २३ ते २४ रुपये प्रती किलोने विकले जाते. कांदा दोन रुपये प्रती किलोने विकला जातो. केवढा मोठा विरोधाभास आहे. प्रती क्विंटल एक हजार रुपये अनुदान कांद्याला मिळाले पाहिजे. कांद्याचा प्रश्न निवारण न झाल्यास मंत्र्यांना कांदा फेक आंदोलनाला सामोरे जावे लागेल.'' असा इशारा प्रभाकर बांगर यांनी दिला.  
 
Web Title: ShivSena is also Responsible for BJP's issue of onion Said Prabhakar Bangar