युतीच्या शक्‍यतेने इच्छुक धास्तावले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

पुणे - मुंबई महापालिका, पिंपरी- चिंचवड महापालिकेसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती होण्याची शक्‍यता निर्माण झाल्यामुळे भाजपच्या शहरातील कार्यकर्त्यांच्या मनात धस्स झाले आहे. युती झाली तर विधानसभा मतदारसंघातील प्रभागांतील समीकरणे बदलणार, या धास्तीने काही आमदार, कार्यकर्ते धास्तावले आहेत. मुळात महापालिका निवडणुकीसाठी भाजपची तयारी शहरात गेल्या दोन महिन्यांपासून जोमाने सुरू आहे. इनकमिंगसाठी पक्षाने स्वतंत्र यंत्रणा उभी केल्यामुळे सुमारे डझनभर नगरसेवकांचा प्रवेश पक्षात झाला. त्याशिवाय माजी नगरसेवक, इतर पक्षांचे पदाधिकारीही मोठ्या संख्येने भाजपच्या रांगेत उभे आहेत.

त्यातच पक्षाने केलेल्या सर्वेक्षणातही बाजी मारण्याची चिन्हे दिसू लागल्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बाहुत बळ संचारले. त्यातच पक्षाच्या चार दिवसांच्या मुलाखतींमध्ये सर्वाधिक म्हणजे आठशेहून अधिक इच्छुकांनी भाग घेतला. शहरातील कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा जास्त इच्छुक भाजपकडे असल्याचे चित्र त्यातून निर्माण झाले. त्यामुळे दोन खासदार, आठही विधानसभा मतदारसंघातील आमदारांनी आपापल्या भागातील इच्छुक आणि उपलब्ध जागांची समीकरणे मांडण्यास सुरवात केली. शहराध्यक्षांचेही आठही विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक प्रभागात दौरे झाले. त्यामुळे स्वबळावर लढण्याची पक्षाच्या स्थानिक नेत्यांची मानसिक तयारी पूर्ण झाली. परंतु मुंबईतून युतीची शक्‍यता व्यक्त होऊ लागल्यामुळे त्यांचा हिरमोड झाला आहे. त्यातच शिवेसेनेच्या नेत्यांनी किमान ६२ जागांचा दावा केला. त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी अधिकच बिचकले आहेत. त्यामुळे ३० पेक्षा अधिक जागा सेनेला देणार नाही, असा सूर काहीजण धरू लागले. या चर्चेतून भाजपच्या एका गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. हजारी यादीची यंत्रणा, प्रभागात ‘डोअर टू डोअर’ कार्यकर्ते पाठविणे, सुशासन पर्वाच्या पुस्तिका घरोघरी पोचविणे, इच्छुकांच्या प्रभागनिहाय बैठका घेणे आदी यंत्रणा भाजपने राबविली. त्यामुळे इच्छुकांच्या अपेक्षा वाढल्या. आता युती झाली, तर ३०-३५ टक्के जागा शिवसेनेला सोडणे पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या जिवावर आले आहे. 

Web Title: shivsena & bjp alliance in municipal election