आढळराव म्हणतात 'मुलाला निवडून आणता आले नाही, माझ्यावर टीका करताय'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर अजित पवार यांनी नुकतीच घणाघाती टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना आढळराव यांनी एकेरी भाषेचा उल्लेख करत टीका केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वादांत वाढ होणार हे निश्चित आहे.

पुणे : ज्याला आपल्या मुलाला निवडून आणता आले नाही, त्याने माझ्यावर टीका करणे बरोबर नाही, अशी बोचरी टीका शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर केली आहे.  

शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर अजित पवार यांनी नुकतीच घणाघाती टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना आढळराव यांनी एकेरी भाषेचा उल्लेख करत टीका केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वादांत वाढ होणार हे निश्चित आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना आढळराव म्हणाले, की अजित पवार स्वतःच्या मुलाला निवडून आणता आले नाही. तेव्हा चेहरा कुणाचा काळवंडलाय हे अख्या महाराष्ट्राने पाहिले आहे. मी राजकारणात स्वतःच्या हिंमतीवर आलोय, माझे चुलते मुख्यमंत्री किंवा कृषिमंत्री नव्हते. बांदल, मोहिते हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. मारामाऱ्या, दंगली तुम्ही घडवायच्या, जमीन व्यवहारातून लोकांची फसवणूक तुम्ही करायची, खंडणी तुम्ही गोळा करायची आणि पोलिसांनी कारवाई केल्यावर नाव आढळराव पाटलांचं घ्यायचं, हे कुठलं राजकारण?.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena leader Shivajirao Adhalrao Patil criticizes Ajit Pawar