Vidhan Sabha 2019 : 'कसब्यावर भगवा फडकवून दाखवणारच'; शिवसेनेची बंडखोरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

कसब्यातून धनवडे यांनी माघार घ्यावी यासाठी खासदार गिरीश बापट यांच्यापासून शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी प्रयत्न केले. परंतु, त्यांनी दाद दिली नाही.

पुणे : शहरातील सात बंडखोरांनी माघार घेतलेली असताना कसबा विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे.

कसब्यातून धनवडे यांनी माघार घ्यावी यासाठी खासदार गिरीश बापट यांच्यापासून शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी प्रयत्न केले. परंतु, त्यांनी दाद दिली नाही.

''मी ही निवडणूक लढवणार आणि कसब्यावर भगवा फडकवून दाखवणार''असे त्यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. त्यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघातील लढत तिरंगी होणार आहे. विद्यमान महापौर आणि भाजपच्या मुक्ता टिळक, काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, आणि शिवसेना बंडखोर विशाल धनवडे यांचा त्यात समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena leader Vishal Dhanawade contest election in Kasba Constituency Pune