Tanaji Sawant: मी तोंड उघडलं तर ८ दिवस हंगामा होईल; दौऱ्यावरुन ट्रोल होणाऱ्या तानाजी सावंतांचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tanaji Sawant
Tanaji Sawant: मी तोंड उघडलं तर ८ दिवस हंगामा होईल; दौऱ्यावरुन ट्रोल होणाऱ्या तानाजी सावंतांचा इशारा

Tanaji Sawant: मी तोंड उघडलं तर ८ दिवस हंगामा होईल; दौऱ्यावरुन ट्रोल होणाऱ्या तानाजी सावंतांचा इशारा

राज्याचे नवे आरोग्यमंत्री आणि शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत सध्या चांगलेच चर्चेत आहेत. या चर्चेचं कारण म्हणजे त्यांचा दौरा. घर ते ऑफिस, ऑफिस ते घऱ असं त्यांचं दौऱ्याचं नियोजन सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं होतं. त्यावरुन ते सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होऊ लागले होते. त्यालाच त्यांनी आता उत्तर दिलं आहे.

हेही वाचा: Tanaji Sawant: घर ते ऑफिस, ऑफिस ते घर; आरोग्यमंत्र्यांच्या दौऱ्याची उडतेय खिल्ली!

राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी, रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरुन या दौऱ्याबद्दल ट्वीट करत त्यांची खिल्लीही उडवली होती. कोणत्याही मंत्र्याचा दौरा जाहीर झाला की, त्यात महत्त्वाच्या लोकांच्या गाठीभेटी, विविध कामांचा आढावा, पत्रकार परिषदा या सगळ्याचा उल्लेख असतो. पण तानाजी सावंतांच्या दौऱ्याच्या कार्यक्रमात मात्र केवळ घर ते ऑफिस, ऑफिस ते घर एवढाच उल्लेख होता. हे ऑफिसही शासकीय नव्हे तर त्यांचं खासगी ऑफिस. त्यामुळे सावंत सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागले होते.

या सगळ्यावरुन तानाजी सावंत संतापले आहेत. त्यांनी याविषयी प्रतिक्रियाही दिली आहे. सावंत म्हणाले की, मी पिंपरी चिंचवडला गेलो, तिथल्या काही लोकांना भेटलो. माझ्या मतदारसंघात एकाचा मृत्यू झाला, तिकडे गेलो, त्याला भेटलो. विविध कामांचा आढावाही घेतला. माझ्या विरोधकांनी तानाजी सावंतांचा एक किलोमीटरचा दौरा असल्याचं सांगितलं. शासनावर ताण येऊ नये म्हणून मी सुरक्षाही टाळतो. वरिष्ठांच्या सूचनेमुळे मी शांत आहे. पण ज्या दिवशी तोंड उघडेन, त्यावेळी ८ दिवस हंगामा माजेल.

Web Title: Shivsena Mla Health Minister Of Maharashtra Tanaji Sawant Getting Trolled Over His Schedule Replies To Opposition

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Health Minister