इंधन दरवाढ रोखण्यात अपयशी सरकारचा निषेध - उमेश वाघ

बाबा तारे
शनिवार, 26 मे 2018

दिवसेंदिवस होत जाणारी पेट्रोल व डिझेलची दरवाढ यामुळे सामान्य नागरीक वैतागला आहे. एकहाती सत्ता असूनही भाजपला या दरवाढीविरोधात ठोस उपाययोजना करता आली नाही. यात पंतप्रधानांसह भाजपचे अपयशच दिसून येत आहे. याचा आम्ही निषेध करत असल्याचे शिवसेनेच्या शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे क्षेत्र प्रमुख उमेश वाघ यांनी सांगितले.

पुणे (औंध) : दिवसेंदिवस होत जाणारी पेट्रोल व डिझेलची दरवाढ यामुळे सामान्य नागरीक वैतागला आहे. एकहाती सत्ता असूनही भाजपला या दरवाढीविरोधात ठोस उपाययोजना करता आली नाही. यात पंतप्रधानांसह भाजपचे अपयशच दिसून येत आहे. याचा आम्ही निषेध करत असल्याचे शिवसेनेच्या शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे क्षेत्र प्रमुख उमेश वाघ यांनी सांगितले.

शिवसेनेच्या वतीने इंधन दरवाढ विरोधात आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्याप्रसंगी वाघ शिवसेना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी शिवसेनेच्या शिवाजीनगर मतदार संघाचे विभाग प्रमुख अमित मुरकुटे, हरिश निकम, राहुल शिरोळे आदी कार्यकर्ते उपस्थि होते. आज सामान्य नागरीकांचा भ्रमनिरास झाला असून शहरातील सार्वजनिक वाहतुक सक्षम नसल्यानेच वाहनांची संख्या रोज वाढत आहे. त्यात पेट्रोल व डिझेलचे दरही वाढत आहेत. त्यामुळे जनता हैराण झाली असून शिवसेना जनतेच्या सोबत असून, या दरवाढीला विरोध करत आहे. जनहिताच्या विरोधातील प्रत्येक निर्णयाला आमचा विरोधच असेल. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या अपयशावर जोरदार टिका करत घोषणाबाजी केली. आंदोलन यशस्वी करण्यासाठी हेमंत डाबी, अनिकेत कपोते, प्रवीण डोंगरे, अभिजीत क्षिरसागर, रोहित जुनवणे इत्यादी शिवसैनिकांनी प्रयत्न केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena protect against bjp