राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक शिवशाही बस स्वारगेटवरून सांगलीला निघाली होती. सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही बस कात्रज बोगदा ओलांडून शिंदेवाडीच्या हद्दीत आली. यावेळी बस चालकाचे नियंत्रण सुटून ही बस येथील सुमारे पंचवीस फुट खोल दरीत कोसळली. या अपघातात ही बस दरीत उलटली. त्यात अनेक प्रवासी अडकले होते.
खेड-शिवापूर(पुणे) : चालकाचे नियंत्रण सुटून शिवशाही बस कात्रज घाटात शिंदेवाडी (ता.भोर) गावच्या हद्दीत सुमारे पंचवीस फुट खोल दरीत उलटली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून 28 प्रवासी जखमी झाल्याची माहिती राजगड पोलिसांनी दिली.
मोठी बातमी : कात्रज घाटात दरीत कोसळली शिवशाही बस; एका प्रवाशाचा मृत्यू
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक शिवशाही बस स्वारगेटवरून सांगलीला निघाली होती. सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही बस कात्रज बोगदा ओलांडून शिंदेवाडीच्या हद्दीत आली. यावेळी बस चालकाचे नियंत्रण सुटून ही बस येथील सुमारे पंचवीस फुट खोल दरीत कोसळली. या अपघातात ही बस दरीत उलटली. त्यात अनेक प्रवासी अडकले होते.
अपघात झाल्याबरोबर स्थानिक नागरीक घटनास्थळी दाखल झाले. राजगड पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी ताबडतोब जखमींना बाहेर काढून खासगी रुग्णालयात दाखल केले. या अपघातात एकुण 28 प्रवासी जखमी झाले असून दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती राजगड पोलिसांनी दिली. राजगड पोलिस, पुणे शहर पोलिस आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहेत.