मोठी बातमी : कात्रज घाटात दरीत कोसळली शिवशाही बस; एका प्रवाशाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

पुणे : कात्रज घाटात शिवशाही बस कोसळल्याची घटना घडली  असून एक प्रवासी मृत्यूमुखी पडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनास्थळी पोलिस, अग्निशमन दल, आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले आहे. 

पुणे : कात्रज घाटात शिवशाही बस कोसळल्याची घटना घडली  असून एक प्रवासी मृत्यूमुखी पडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनास्थळी पोलिस, अग्निशमन दल, आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले आहे. 

कात्रज जूना घाट संपल्यावर शिंदेवाडी (हद्दीत) शिवशाही बस सुमारे वीस पंचवीस फुट खोल दरीत कोसळली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने आज दुपारी दीड वाजता हा अपघात झाला आहे. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याची भीती आहे. पोलिस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.
 
'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

दरम्यान, कात्रज घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली असून बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे.  वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न स

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivshahi bus collapses in the valley at Katraj Ghat and death of one passenger