बाबासाहेब पुरंदरे 98व्या वर्षी पोहोचले संघाच्या पथसंचलनाला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

दसऱ्यानिमित्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाला हजेरी लावली. पथसंचलनातील पुरंदरे यांच्या सहभागाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जातोय. 

पुणे : दसऱ्यानिमित्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाला हजेरी लावली. पथसंचलनातील पुरंदरे यांच्या सहभागाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जातोय. 

आज दसऱ्याच्या निमित्ताने पुण्यातील पर्वती भागातील लक्ष्मीनगरच्या सह्याद्री मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते. संघाच्या शिस्तीत वाढलेल्या बाबासाहेब पुरंदरे यांनी आज, या संचलनाला हजेरी लावली. बाबासाहेब पुरंदरे यांचे वय 98 आहे. त्यामुळे यावयातही त्यांती दसऱ्याच्या पथसंचलनाती हजेरी त्यांच्यातील उर्जेची प्रचिती देत आहे. संचलनापूर्वी बाबासाहेब पुरंदरे आणि इतर उपस्थितांचे महिलांनी औक्षण केले. 

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र सांगण्याचे काम आयुष्यभर करणारे व्यक्तिमत्व म्हणून, बाबासाहेब पुरंदरे यांची ओळख आहे. त्यांनी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण तर, भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने गौरवले आहे. इतिहास संशोधक ग. ह. खरे यांचे शिष्य असलेल्या बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या 14व्या वर्षापासून शिवकालीन इतिहासाचा अभ्यास सुरू केला. शिवरायांच्या जीवनावरील आधारीत जाणता राजा हे महानाट्य जगभर पोहोचले.  इतिहासकार गो. नी. दांडेकर यांच्यासोबत त्यांनी सह्याद्रीतील अनेक गड किल्ल्यांना प्रत्यक्ष भेटी दिल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivshahir babasaheb purandare was present to rss dasara celebration pune