शिवसृष्टी उद्यानातील शिवशिल्पे खचली, उद्यान विभागाचे दुर्लक्ष

रमेश मोरे
शनिवार, 17 मार्च 2018

जुनी सांगवी (पुणे) : पिंपरी चिंचवड शहरीतील उद्यानाच्या पहिल्या क्रमांकाच्या यादीत नाव असलेल्या व जुनी सांगवीच्या सौंदर्यात वैभव असणाऱ्या महापालिकेच्या शिवसृष्टी उद्यानातील शिवइतिहासावर आधारीत प्रसंगावरील दोन शिल्पे पाया खचल्यामुळे झुकली आहेत.

जुनी सांगवी (पुणे) : पिंपरी चिंचवड शहरीतील उद्यानाच्या पहिल्या क्रमांकाच्या यादीत नाव असलेल्या व जुनी सांगवीच्या सौंदर्यात वैभव असणाऱ्या महापालिकेच्या शिवसृष्टी उद्यानातील शिवइतिहासावर आधारीत प्रसंगावरील दोन शिल्पे पाया खचल्यामुळे झुकली आहेत.

गेली अनेक दिवसांपासुन झुकलेली ही शिल्पे शेजारील भिंतीवर कोसळु शकतात. तर एका शिल्पाने झाडाच्या आधाराने तग धरली आहे. ते ही कोणत्याही प्रसंगी पाया खचल्याने कोसळु शकते. या उद्यानात शिवाजी महाराजांच्या बालपणापासूनच्या इतिहासातील प्रसंगावर आधारीत इतिहास शिल्पांद्वारे साकारण्यात आलेला आहे. सांगवी व पंचक्रोशीतुन शिवसृष्टी उद्यान व येथील शिवशिल्पे पाहण्यासाठी नागरीक गर्दी करतात. मात्र गेली अनेक दिवसांपासून यातील दोन शिल्पे पाया खचल्यामुळे झुकली आहेत. याची पुन:उभारणी करून ती सुस्थितीत करावी अशी सांगवीकर नागरीकाकडुन मागणी होत आहे.

गेली आठवडाभरापासुन येथील पाण्याचा विद्युत पंप नादुरस्त झाल्याने हिरवळीवर पाणी मारण्यात आलेले नाही. वाढत्या उन्हाच्या चटक्यामुळे व पाण्याच्या अभावामुळे येथील हिरवळ सुकत चालली आहे. गेली अनेक दिवसांपासुन येथील देखभाल व्यवस्थित होत नसल्याने याकडे उद्यान विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसुन येते. याबाबत येथील सुरक्षा व देखभाल यंत्रणेकडे विचारणा केली असता गेली आठ दिवसांपासुन विद्युत पंपात बिघाड झाल्याचे सांगण्यात आले. दुरूस्ती साठी सांगण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांकडुन सांगण्यात आले. नुकतेच उद्यानाअंतर्गत असलेल्या जॉगींग ट्रॅकच्या फरशी बदलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.याबरोबरच शिवशिल्पांचीही दुरूस्ती करावी अशी मागणी नागरीकांमधुन होत आहे.

येथील दुरूस्तीचे काम स्थापत्य विभागाच्या अखत्यारीत आहे. तसे त्यांना कळविले आहे, असे  उद्यान अधिकारी जे.व्ही.पटेल यांनी सांगितले. उद्यानाअंतर्गत असलेल्या पदपथाचे फरशी बदलण्याचे काम सुरू आहे. झुकलेली शिल्पे प्रत्यक्ष पाहणी करून नविन बेसमेंट करून कशी उभी करता येईल याचा आढावा घेऊन काम करण्यात येईल, असे स्थापत्य विभागाच्या मुख्याधिकारी अंकिता मोरे यांनी सांगितले. शिवशिल्पाच्या खचलेल्या पायाबाबत संबंधितांना सुचना दिल्या आहेत. पुन्हा त्या खाली पाया भरून शिल्पे उभारण्यात येतील, नगरसेवक हर्षल ढोरे यांनी सांगितले.

Web Title: shivsrushti garden in bad condition, ignorance of authorities