शिवसृष्टी उद्यान परिसराची स्वच्छता

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

जुनी सांगवी : जुनी सांगवी येथील शिवसृष्टी उद्यानालगत पडलेला कचरा उचलण्याचे व परिसर स्वच्छतेचे काम आरोग्य विभागाकडुन सुरू करण्यात आल्याने नागरीकांमधुन समाधान व्यक्त केले जात आहे.

याबाबत येथील कचरा समस्येकडे शनिवार ता.३१ सकाळमधुन सचित्र बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. सध्या मुळा नदीत फोफावलेल्या जलपर्णीमुळे जुनी सांगवीत डासांचे प्रमाण वाढले आहे. या उद्यानात योग ध्यान धारणा केंद्र असल्याने उद्यानात सकाळी व रात्री आबालवृद्धांची गर्दी असते. व्यायाम योग करताना डासांच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची खंत जेष्ठ महिलांनी सकाळकडे व्यक्त केली होती.

येथील परिसर स्वच्छते बरोबरच परिसरात धुरीकरण करण्यास सुरूवात केल्याने नागरीकांमधुन समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र डासांचा प्रादुर्भाव पाहता धुरीकरण नियमित व्हावे व डासांच्या उत्पत्तीचे कारण असलेली मुळा नदीतील जलपर्णी तात्काळ काढण्यात यावी असे नागरीकांनी सांगीतले. याबाबत नगरसेवक हर्षल ढोरे म्हणाले,आरोग्य विभागास परिसर स्वच्छतेच्या सुचना दिल्या आहेत. स्वच्छतेचे काम सुरू करण्यात आले आहे. नियमित धुरीकरण करण्यास सांगीतले आहे.याचबरोबर जलपर्णीची समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याबाबत आयुक्तांना प्रभागातील चारही नगरसेवकांच्या वतीने लेखी व तोंडी कळविले आहे.

Web Title: shivsrushti garden cleaning sangvi