पुणे - शिवसृष्टी उद्यान सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली

रमेश मोरे
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी येथील महापालिकेच्या शिवसृष्टी उद्यानात महापालिका उद्यान विभाग व पालिका प्रशासनाकडुन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे आता शिवसृष्टी उद्यान व येथील परिसर कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली आला आहे.

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी येथील महापालिकेच्या शिवसृष्टी उद्यानात महापालिका उद्यान विभाग व पालिका प्रशासनाकडुन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे आता शिवसृष्टी उद्यान व येथील परिसर कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली आला आहे.

या उद्यानात शिवाजी महाराजांचा बालपणापासुनचा इतिहास शिल्पाद्वारे साकारण्यात आलेला आहे. याचबरोबर येथे पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात प्रशस्त योगध्यानधारणा केंद्र उभारण्यात आलेले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकाळात माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांनी सुरक्षेच्या कारणास्तव येथे २०१६ ते २०१७ पर्यंत पालिका प्रशासनाकडे येथील जॉगींग ट्रॅक, सीसीटीव्ही कॅमेरे, बालचमुंसाठी खेळणी व अन्य सुधारणा करण्याबाबत निवेदनाद्वारे पाठपुरावा केला होता.

अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले. येथील अंतर्गत भाग, प्रमुख दरवाजा व कोपऱ्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याने उद्यानाबरोबरच उद्यानाबाहेरचा परिसरही सुरक्षेखाली आला आहे. सिमा भिंतीलगत यापुर्वी काही नागरीक कचरा टाकुन अस्वच्छता करायचे त्यामुळे सिमाभिंतीजवळ कचरा पडायचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे कचरा टाकणाऱ्या नागरीकांवरही आता जरब बसणार आहे.

नुकतीच येथे मुलांसाठी खेळणी बसविण्यात आली आहेत. याचबरोबर जॉगींग ट्रॅकचे काम ही पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.शिवसृष्टी उद्यानांतर्गत व बाहेर सीसीटीव्ही कँमेरे बसविण्याचा प्रस्ताव होता.कॅमेरे बसवल्यामुळे उद्यानाबरोबरच परिसर सुरक्षा देखरेखीखाली आला आहे.याचा फायदा होईल, असे नगरसेवक संतोष कांबळे यांनी सांगितले. 

Web Title: shivsrushti garden under surveillance of cctv