शिवसृष्टीचे काम ऑक्‍टोबरअखेर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

पिंपरी - थेरगाव-डांगे चौक येथे २८ म्युरल्सद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट आणि मराठ्यांचा इतिहास उलगडणार आहे. त्यासाठी उभारल्या जात असलेल्या शिवसृष्टीचे काम ऑक्‍टोबरअखेर पूर्ण होणार आहे. 

पिंपरी - थेरगाव-डांगे चौक येथे २८ म्युरल्सद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट आणि मराठ्यांचा इतिहास उलगडणार आहे. त्यासाठी उभारल्या जात असलेल्या शिवसृष्टीचे काम ऑक्‍टोबरअखेर पूर्ण होणार आहे. 

येथील शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारूढ पुतळ्याशेजारी शिवसृष्टी उभारण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी तीन कोटी ४० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. संबंधित कामात प्रवेशद्वार, १२ मीटर उंचीचा ध्वजस्तंभ, एक हजार १०० चौरस फूट जागेत म्युरल्स असे नियोजन आहे. संबंधित काम ५ ऑक्‍टोबर २०१६ ला सुरू झाले. त्यासाठी १२ महिन्यांची मुदत दिलेली होती. हे काम पूर्ण करण्यासाठी ३१ ऑक्‍टोबर २०१८ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.    

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट म्युरल्सद्वारे मांडण्यासाठी आवश्‍यक डिझाइन बनविण्याचे काम सध्या सुरू आहे. तसेच, प्रवेशद्वार व अन्य अंतर्गत सुशोभीकरणाची कामे सुरू आहेत. ते पूर्ण झाल्यानंतर शहराला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठीदेखील शिवसृष्टी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू शकणार आहे.

शिवसृष्टीच्या कामासाठी दगडी कोरीव काम आणि उलट करता येण्याजोगा साचा (रिव्हर्सिबल मोल्ड) तयार करावा लागणार आहे. ग्लास इन्फोर्स क्राँक्रीटमध्ये हे काम करत आहोत. त्यामुळे त्याला वेळ लागत असल्याने कामाला उशीर होत आहे. ऑक्‍टोबरअखेर ते पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
- शिरीष पोरेड्डी, प्रवक्ते, स्थापत्य विभाग

Web Title: Shivsrushti work ends at the end of October