शिवतारे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

पुणे - मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रम पत्रिकेत उल्लेख नसल्याने संतप्त झालेल्या राज्यमंत्री विजय शिवतारे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे. कॅशलेस व्यवहारांबाबत जनजागृती होण्यासाठी "डीजी धन' मेळाव्याच्या पत्रिकेवर त्यांच्या नावाचा आवर्जून उल्लेख करण्यात आला आहे. 

पुण्यात पंतप्रधानांच्या उपस्थितीत झालेल्या मेट्रो भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत शिवतारे यांचे नाव नव्हते. त्यावरून शिवतारे यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांना लक्ष्य केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने "डीजी धन' मेळाव्यांचे आयोजन केले आहे. राज्य सरकारनेही यासाठी पुढाकार घेतला असून स. प. महाविद्यालयात शनिवारी (ता.7) सकाळी अकरा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाच्या पत्रिकेत शिवतारे यांचा उल्लेख करण्यात आला आहे. 

केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे शिवतारे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करण्यात आला आहे. 

Web Title: shivtare try to remove the displeasure