Video : Shocking पुण्यात तरुणाची काढली नग्न धिंड; दिले सिगारेटचे चटके

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

पीडित तरुण व्यावसायिक हे मूळचे कर्नाटक येथील आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी कोंढवा येथे गाडी दुरुस्तीचा व्यवसाय सुरू केला. 16 नोव्हेंबरपूर्वी त्याच्याकडे जग्वार कंपनीची एक गाडी आरोपींच्या ओळखीने त्यांच्याकडे दुरुस्तीसाठी आली होती. त्यामुळे त्यांनी व्यावसायिकास दुरुस्तीच्या खर्चापेक्षा पाच लाख रुपये अधिक घ्यायला सांगितले. मात्र पीडित व्यावसायिकाने अडीच लाख रुपये घेतले. याच रागातून आरोपींनी त्यांचे अपहरण केले.

पुणे : जॅग्वार कंपनीची चारचाकी दुरुस्त करण्यासाठी मध्यस्थीने सांगितल्यापेक्षा कमी पैसे घेतल्याने आठ तरुणांनी वाहनांची दुरुस्ती करणाऱ्या व्यावसायिकाची नग्नावस्थेत धिंड काढून त्यांना सिगारेटचे चटके दिल्याचा भयानक प्रकार समोर आला आहे.

आरोपींनी संबंधित व्यवसायिकचे 16 नोव्हेंबरला कोंढवा येथील गॅरेजमधून अपहरण करून त्यांना हडपसर आणि खराडी परिसरात नेले. तेथे व्यावसायिकाचे कपडे काढून त्यांना लाथा-बुक्‍क्‍याने मारहाण केली. तसेच अंगावर थुंकले. त्यानंतर त्यांची नग्नावस्थेत धिंड काढून अंगावर सिगारेटचे चटके दिले. हा सर्व प्रकार केल्यानंतर आरोपींनी व्यावसायिकास पहाटे साडेतीनच्या सुमारास पुन्हा त्यांच्या गॅरेजजवळ सोडले. 

चोरी करायला गेले चक्क प्राथमिक शाळेत 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडित तरुण व्यावसायिक हे मूळचे कर्नाटक येथील आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी कोंढवा येथे गाडी दुरुस्तीचा व्यवसाय सुरू केला. 16 नोव्हेंबर पूर्वी त्याच्याकडे जग्वार कंपनीची एक गाडी आरोपींच्या ओळखीने त्यांच्याकडे दुरुस्तीसाठी आली होती. त्यामुळे त्यांनी व्यावसायिकास दुरुस्तीच्या खर्चापेक्षा पाच लाख रुपये अधिक घ्यायला सांगितले. मात्र पीडित व्यावसायिकाने अडीच लाख रुपये घेतले. याच रागातून आरोपींनी त्यांचे अपहरण केले.
मालकाच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या 

घटनेच्या दुसऱ्या दिवशी याबाबत तक्रार करण्यासाठी मी कोंढवा पोलिस ठाण्यात गेलो होते. मात्र अद्यापही पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. पोलिस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र आता या प्रकाराचा व्हिडिओ समोर आल्याने पोलिस गुन्हा दाखल करण्यासाठी सरसावले असल्याचा आरोपी संबंधित पीडित व्यावसायिकाने केला. 

दिवसाआड पाणी पुरवठा निर्णयाचे पिंपरी महापालिकेच्या सभेत तीव्र पडसाद


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking A boy in pune was physically abused in Kondhwa