धक्कादायक : कुलर फिरविला नाही म्हणून त्याने बायकोवर केले चाकूने वार!

Crime_Stabbing
Crime_Stabbing

पुणे : पहाटेच्यावेळी गरम होत असल्याने पत्नीला कूलरचा फॅन आपल्या दिशेने फिरविण्यास सांगूनही तिने दुर्लक्ष केल्याने पतीने पत्नीवर चाकूने वार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना रविवारी (ता.२४) पहाटे विश्रांतवाडीमधील शांतीनगर परिसरात घडली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

रोहित मोरे (वय 31, रा. शांतीनगर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सागर आल्हाट यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित मोरे लष्करात आचारी म्हणून कामाला आहे. तो सध्या श्रीनगर येथे कार्यरत आहे. मात्र दीड महिन्यापूर्वी तो सुट्टीवर आला. तो त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. त्यामुळे दोघामध्ये सातत्याने भांडणे होत होती.

दरम्यान, रविवारी पहाटे मोरेने त्याच्या पत्नीला कूलरचा फॅन त्याच्याकडे करण्यास सांगितले. मात्र पत्नीने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे मोरे याने चिडून घरातील चाकूने पत्नीवर वार केले. 
तसेच स्वतःच्या गळ्यावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने महिलेस रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र महिलेची प्रकृती गंभीर आहे.

या घटनेची खबर मिळताच पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहाय्यक पोलिस आयुक्त लक्ष्मण बोराटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड, पोलिस निरीक्षक (गुन्हे) रवींद्र कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप यादव करीत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com