पुणे : अंघोळ करताना महिलेचे केले चित्रिकरण; आरोपीस अटक

Shooting when woman while bathing in pune accused get arrested
Shooting when woman while bathing in pune accused get arrested

पुणे : बाथरुमच्या छोट्या खिडकीतुन अंघोळ करणाऱ्या महिलेचे एकाने मोबाईलद्वारे चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिलेच्या कुटुंबीयांनी आरोपीस पकडून शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. हा प्रकार शिवाजीनगर परिसरामध्ये घडला. 

मारूती मरीअप्पा झोपळे (वय38, रा. शिवाजीनगर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन आरोपीविरुद्ध विनयभंगासह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये (आयटी ऍक्‍ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात 1995, 2014मध्ये कसे होते खाते वाटप? वाचा सविस्तर...

हा प्रकार 19 ऑक्‍टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीमध्ये घडला. फिर्यादी महिला या बाथरुमध्ये आंघोळ करीत होत्या. त्यावेळी बाथरुमच्या दरवाजाच्या विरुद्ध बाजुला असलेल्या भिंतीच्या छतालगत आतमध्ये हवा येण्यासाठी छोटी खिडकी तयार करण्यात आली आहे. तेथूनच आरोपीने मोबाईलद्वारे चित्रीकरण केले. खिडकीत असलेला मोबाईल निदर्शनास आल्यानंतर महिलेस संशय आला. त्यांनी लक्षपुर्वक पाहीले, त्यावेळी एक व्यक्ती त्यांचे आंघोळ करतानाचे चित्रीकरण करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

सत्तासंघर्षाच्या पेचानंतर काय असतील, महाराष्ट्रासमोरील राजकीय पर्याय?

हा प्रकार त्यांनी त्यांच्या कुटुंबीयीयांच्या कानावर घातला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी आरोपीस पकडले. त्यानंतर त्याच्या हातातील मोबाईल घेऊन पाहणी केली. तेव्हा त्याने याच पद्धतीने तीन वेळा चित्रीकरण केल्याचे दिसून आले. या घटनेनंतर महिलेच्या कुटुंबीयांनी त्याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करुन त्यास पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीकडून गैरकृत्य करण्याच्या उद्देशाने चित्रीकरण केले जात असल्याची शक्‍यता आहे. त्यादृष्टीने शिवाजीनगर पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com